Nashik | आली समिप घटिका; नाशिक, मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज होणार जाहीर, कोणाचा पत्ता कटणार?

नाशिक महापालिकेची प्रभाग रचना फुटल्याचा दावा होत आहे. महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे.

Nashik | आली समिप घटिका; नाशिक, मुंबई महापालिकेची प्रभाग रचना आज होणार जाहीर, कोणाचा पत्ता कटणार?
Nashik Municipal Corporation.
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:23 AM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या रणसंग्रामात आता रंगत येणार असून आज मंगळवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरापर्यंत प्रभाग रचना जाहीर होणार आहे. अखेर निवडणूक आयोगाने राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकीसाठी टप्प्या-टप्प्याने प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमास मंजुरी दिलीय. त्यानुसार नाशिक आणि मुंबईमध्ये (Mumbai) ही प्रभाग रचना जाहीर होईल. त्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना पाठवता येतील. महापालिकेच्या वतीने या सूचना 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी या विहित नमुन्यात विवरण पत्रासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील.

आरक्षण सोडत नाही

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूय. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करताना यंदा आरक्षण सोडत काढली जाणार नाही. नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन आणि शहरातील 6 विभागात ही प्रभाग रचना एकाच वेळेस प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या प्रभाग रचनेत कोणाचा वॉर्ड बदलणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता आहे. अनेक इच्छुकांनी त्यासाठी देव पाण्यात घालून ठेवलेत.

प्रभाग रचना फुटल्याची चर्चा

नाशिक महापालिकेची प्रभाग रचना फुटल्याचा दावा होत आहे. महापालिकेतील काही मातब्बर नगरसेवकांनी त्यासाठी खेळी केली असून, आपल्या सोयीनुसार वार्डांची रचना केली आहे आणि आपल्याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे. सिडकोतील एका नगरसेवकाच्या घरात बसून ही प्रभाग रचना तयार केली जात आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकानेच केला होता, त्यामुळे आजच्या प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे.

नगरेसवकांची संख्या 133 वर

नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 अशी करण्यात आली आहे.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.