Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ

Chhagan Bhujbal Nashik Home Security : छगन भुजबळ आमचे दैवत, भुजबळ साहेबांना धमकी देणार असाल तर...; भुजबळांच्या समर्थनार्थ 'हा' नेता मैदानात. छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या घराच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. उद्या भुजबळांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त येणाऱ्या लोकांचीही तपासणी होत आहे.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 12:07 PM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 14 ऑक्टोबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कालच मंत्री छगन भुजबळ यांना आली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आला आहे. उद्या मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. भुजबळांना आलेल्या धमकीच्या प्रार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे भुजबळांच्या नाशिकमधील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल जीवे मागण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या वाढदिवसानिमित्ताने पोलीस बंदोबस्त राहणार आहे. वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांना भेटायला येणाऱ्या लोकांची तपासणी केली जाणार आहे. छगन भुजबळ यांच्या थेट जवळ जाण्यासाठी मनाई असणार आहे. आजपासूनच भेटायला येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. भुजबळांना धमकी आल्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

छगन भुजबळ धमकी प्रकरणावर रासपचे नेते महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ जानकर मैदानात उतरलेत. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे माईलस्टोन आहेत. छगन भुजबळ आमचे दैवत आहेत. छगन भुजबळसाहेबांना धमकी देणार असाल तर बाकी समाज गप्प कसा गप्प बसेल? अशा धमकी देऊ नका. हे योग्य नाही. कायद्याने सगळ्यांना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असं महादेव जानकर म्हणालेत.

भुजबळांना धमकी देणं हे चूक आहे. भुजबळ आमचे दैवत आहेत. त्यांना धमकी दिली जात असेल. तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. अशा धमकी देऊ नका. या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असंही महादेव जानकर म्हणालेत.

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.