घराचा दरवाजा बंद झाला, आईने बाळासाठी चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी पाईपचा आधार घेतला
Nashik News : आपल्या लेकराच्या ओढीने त्याच्या जवळ जाण्यासाठी 'आई' काहीही करू शकते. हे नाशिकच्या पेठरोड भागातील अष्ठविनायक नगर येथील एका सोसायटीत पाहायला मिळालं आहे. नाशिकमध्ये या घटनेची सगळीकडं चर्चा सुरु आहे.
![घराचा दरवाजा बंद झाला, आईने बाळासाठी चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी पाईपचा आधार घेतला घराचा दरवाजा बंद झाला, आईने बाळासाठी चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी पाईपचा आधार घेतला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/01165251/nashik-news-32.jpg?w=1280)
नाशिक : तृप्ती जगदाळे (Trupti jagdale) कचरा टाकण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजातून गॅलरीत गेल्या होत्या. यावेळी त्यांचे दीड महिन्याचे बाळ ‘मल्हार’ घरातच झोपले होते. मात्र अचानक मागच्या दरवाजातून हवा आल्याने मुख्य दरवाजा बंद झाला, त्यावेळी तृप्ती या घराच्या बाहेर होत्या. त्यावेळी घरातील सगळी मंडळी बाहेरगावी गेल्यामुळे बाळाची आई एकदम चिंताग्रस्त झाली होती. त्याचबरोबर घराच्याबाहेर बाळाची आई पर्यायाचा विचार करीत (emotional story in marathi) बसली होती. डोक्यात त्यांच्या वेगवेगळे विचार येत असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाईपवरुन चौथ्या मजल्यावर पोहोचल्या. मागच्या बाजूने गॅलरीतून त्या त्यांच्या घरात पोहोचल्या. सध्या ही घटना नाशिकमध्ये (Nashik News) सगळीकडं व्हायरल झाली असल्यामुळे त्याची चर्चा देखील सुरु आहे.
तृप्ती आणि बाळ हे दोघेच घरात होते.
ही घटना नाशिकच्या पेठरोड भागातील अष्ठविनायक नगर येथील एका सोसायटीत घडली आहे. बाळाची आई आणि बाळ दोघेचं घरात होते. हवेमुळे अचानक दरवाजा बंद झाला. त्यानंतर आता काय करायचं, असा प्रश्न तृप्ती यांच्यापुढे उभा राहिला ? मग त्यांनी शेजारच्या घरातून मागच्या गॅलरीत जाऊन तिथून पाईपच्या साहाय्याने चढून स्वतःच्या घरात प्रवेश केला. तृप्ती यांचे घर चौथ्या मजल्यावर आहे. मात्र त्यांना बाळाच्या ओढीने या इतक्या मोठ्या उंचीची त्यांना अजिबात भीती वाटली नाही. घरात प्रवेश करताच त्यांनी बाळाला कवटाळले अशी माहिती सांगितली आहे.
आईच्या धाडसाची आणि बाळाच्या ओढीची ही घटना नाशिकमध्ये घडली आहे. या आई तृप्ती जगदाळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळासाठी पाईपच्या साहाय्याने स्वतःच्या घरात जाऊन बाळाकडे धाव घेतली. त्यांना हा प्रसंग सांगताना अंगावर काटे येत होते. त्यांचबरोबर डोळ्यात अश्रू देखील तरळले होते.
मिळालेली माहिती अशी की, बाळाची आजी आणि बाळाचे बाबा हे बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. बाळं आतमध्ये अडकल्यामुळे बाळाच्या आईला काहीचं चुलत नव्हतं. कुठल्याही परिस्थिती त्यांना बाळाजवळ जायचं होतं.