नाशिकमध्ये मक्याला उच्चांकी भाव; तब्बल 3 वर्षांनंतर सुगीचे दिवस, कारण काय?

एकीकडे कांद्याच्या भावामध्ये कमालीची घसरण होत असताना दुसरीकडे मक्याचे वाढणारे भाव शेतकऱ्यांना दिलासा देतायत. येणाऱ्या काळात या भावात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिकमध्ये मक्याला उच्चांकी भाव; तब्बल 3 वर्षांनंतर सुगीचे दिवस, कारण काय?
नाशिक जिल्ह्यात मक्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:57 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) तब्बल तीन वर्षांनंतर मक्याला (Maize) सुगीचे दिवस आले असून, सध्या बाजारात क्विंटलमागे 2300 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. खरे तर दरवर्षी मक्याचे भाव कमी असतात. केंद्र सरकरानेही मक्याचा हमीभाव क्विंटलमागे फक्त 1870 रुपये इतकाच जाहीर केलाय. अनेकदा हा भाव मिळणेही कठीण असते. मात्र, यंदा गेल्या काही दिवसांपासून मक्याच्या भावाने 2100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) मक्यापेक्षा सोयाबीनचा जास्त पेरा केला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी झाले. त्याचाही भाववाढीवर परिणाम झाला. जिल्ह्यात खरिपात 2 लाख 29 हजार 714 हेक्टरवर मक्याचा पेरा झाला होता. आता एकीकडे कांद्याच्या भावामध्ये कमालीची घसरण होत असताना दुसरीकडे मक्याचे वाढणारे भाव शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. येणाऱ्या काळात या भावात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे पाहता आता शेतकऱ्यांनीही एकच पीक न घेता वेगवेगळ्या पिकांकडे वळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

का वाढले अचानक भाव?

मक्याला सध्या कुकुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून मोठी मागणी आहे. यापूर्वी सोयाबीनला कोंबड्याचे खाद्य म्हणून पसंदी दिली जायची. मात्र, सोयाबीनचे दर वाढत आहेत. त्यात कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय संकटात आला आहे. अनेकांनी सोयाबीनचे दर कमी असताना खरेदी केली नाही. त्यामुळे हे सारे व्यावसायिक आता मक्याच्या खरेदीसाठी सरसावले आहेत. त्यात मक्याचे उत्पादनही कमी झाल्याने भाव वाढत आहेत. गेल्या 3 वर्षांपूर्वी मका दोन हजारावर गेला होता. मात्र, आता तोही टप्पा ओलांडून भाव चक्क तेवीसशेपर्यंत गेले आहेत.

बांग्लादेशमध्ये मागणी

बांग्लादेशमध्ये मक्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या भारतातील मक्याचा साठा संपत आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, पाचोरा भागातील मका आता बाजारपेठेत यायला सुरुवात झाली आहे. या वेळेचाही शेतकऱ्यांना फायदा होत आहे. अनेक व्यापारी बिहारमध्ये मक्याचे उत्पादन झाल्याचे सांगत आहेत. मात्र, या मालाची निर्यात होणाराय. हे सारे पाहता महाराष्ट्रात मक्याला अजूनही चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हे नक्की.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.