“या देशात शिवाजी महाराज यांनी पुन्हा जन्म घेणं गरजेचं”; हुसेन दलवाई यांचे मोठं वक्तव्य…

| Updated on: May 19, 2023 | 10:32 AM

या देशात जे सरकार सत्तेत आहे त्यांच्याकडे सध्या देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या योजना नाहीत. इतके प्रश्न असतानाही देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही,काही उपाय योजना नाही.

या देशात शिवाजी महाराज यांनी पुन्हा जन्म घेणं गरजेचं; हुसेन दलवाई यांचे मोठं वक्तव्य...
Follow us on

नाशिक : मागील दोन दिवसांपासून एका त्र्यंबकेश्वर मंदिरातील हिंदूशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे हा फलक प्रचंड चर्चेत आला आहे. त्यामुळे या फलकावरून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील या फलकावरून वाद उफाळून आल्यानंतर आणि या घटनेची जोरदार चर्चा चालू झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी सांगितले की, धार्मिक सलोखा बिघेडल आणि जे येथील स्थानिक नागरिक मुस्लिम समाजामागे उभे राहिले त्यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे ज्या कार्यरत असणाऱ्या दहा-बारा संघटना आहेत. त्या कशा काय कार्यरत आहेत, त्यांची आधी चौकशी करा अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी समाचार घेतला.

या अशा प्रकारामुळेच देशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हिंदूशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे हा फलक या मंदिरात लावला असला तरी मी मंदिरात जाऊन बाहेरून मी दर्शन घेतले आहे. त्यामुळे मंदिरात तो फलक लावला असला तरी मंदिरातील मूर्तीचे मी दर्शन घेतले आहे असंही हुसेन दलवाई यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, मंदिरात जाण्याचा प्रश्न नाही मात्र मी बाहेरुन दर्शन घेतलं आहे, दर्शनही चांगलं मिळालं त्यामुळे या गोष्टीवरून धार्मिक सलोखा कुणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची आधी चौकशी करा, त्यांच्या एसआयटी नेम असंही हुसेन दलवाई यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, आपल्या देशात सर्वसम्यक संस्कृती आहे, गंगा-जमुनाची संस्कृती आहे. आपल्या देशात आर्य आले तेही बाहेरचेच आहेत. मात्र जी लोकं इथे आले आहेत, त्यांना कुणा इथं नको म्हणणार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर देशातील बहुसंख्य मुस्लमाना इथलेच आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजही हिंदू मंदिराचा आदर करतो असंही त्यांनी सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघवडणाऱ्यांना टोला लगावला आहे.

हुसेने दलवाई यांनी कोकणातील धार्मिक सलोख्यांचे उदाहरण देताना सांगितले की, महालक्ष्मी साळूबाईचा पालखी येते,तीही पहिल्यांदा दलवाईवाड्यातच येते त्यामुळे अजूनही तिथे सामाजिक आणि धार्मिक सहसंबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित केले गेले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

या देशात जे सरकार सत्तेत आहे त्यांच्याकडे सध्या देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या योजना नाहीत. इतके प्रश्न असतानाही देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही,काही उपाय योजना नाही.

बेरोजगारांना रोजगार दिला जात नाही, शिक्षणाचे कोणतेही धोरण नाही, काही मोजक्या लोकांनाच उद्योग देण्याचा, रेल्वेही देण्याचा प्रयत्न झाला त्या लोकांकडून हा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

यावेळी त्यांनी स्थानिक लोकांचेही कौतूक करत त्यांनी हे प्रकरण होऊनसुद्धा येथील लोकं शांत राहिली हे महत्वाचे आहे असंही त्यांनी सांगितले.