Nashik News | नाशिकमध्ये NCP तर्फे प्रीमियर लीगचे आयोजन; तरुणांना Cricket मध्ये प्रभाग संधी

नाशिकमधील सर्व प्रभागात टर्फ क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. खरे तर शहरात योग्य क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे, अशी अपेक्षा असते. मात्र, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता म्हणाव्या तशा स्पर्धा होत नाहीत. हीच बाब हेरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Nashik News | नाशिकमध्ये NCP तर्फे प्रीमियर लीगचे आयोजन; तरुणांना Cricket मध्ये प्रभाग संधी
अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक.
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 4:21 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्व प्रभागात प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील क्रिकेट खेळणाऱ्या होतकरू तरुणांना क्रीडा (Sport) क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रभागात टर्फ क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. खरे तर शहरात योग्य क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे, अशी अपेक्षा असते. मात्र, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता म्हणाव्या तशा स्पर्धा होत नाहीत. हीच बाब हेरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भर उन्हाळ्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतर पक्षही असे नाना उपक्रम या निमित्ताने राबवू शकतात. त्यानिमित्ताने प्रचार आणि स्पर्धा दोन्हीचा योग जुळून येऊ शकतो.

कधी होणार स्पर्धा?

नाशिक शहरातील सहा विभागात प्रभागनिहाय टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी 20 मार्च रोजी ग्रीन फिल्ड टर्फ, पंचवटी येथून होणार आहे. प्रभाग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक टीमला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज व विजेत्या टीमला आकर्षक परितोषिक वितरण करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर

नाशिक महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यांमध्ये होतेय. सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यात पुन्हा एकदा प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडील इच्छुकांना निवडणुकीची तयारी करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या स्पर्धा होत आहेत.

प्रभाग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक टीमला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज व विजेत्या टीमला आकर्षक परितोषिक देत गौरविण्यात येणार आहे. – अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.