Nashik News : माझ्या नादाला लागले की कार्यक्रम उलटा असतो…; मनोज जरांगे यांचं छगन भुजबळांना काय प्रत्यु्त्तर?
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : कधीतरी मराठ्यांची भावना समजून घ्या. परतफेड करायची वेळ आली आहे. मी उलटा औलादीचा नाही, ते पाहुणे आहेत का ? भुजबळ साहेबांवर चार दिवस झाले मी बोलत नाही. पण मराठ्यांच्या मुलांच्या ताटात विष कालवू नका , असं जरांगे म्हणालेत.

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी येवला, नाशिक 09 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांनी आज नाशिकमध्ये मराठा आरक्षणावर भाष्य केलं. यावेळी जरांगे यांना ऐकण्यासाठी आलेले लोक उन्हात बसलेले होते. तर मनोज जरांगे पाटील व्यासपीठावरून खाली आले आणि उन्हात उभे राहून भाषण केलं. मला खुर्ची नाही पाहिजे. मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हटायचं नाही. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून त्यांनी आरक्षण घेतलं. रात्रीतून आरक्षण घेतलं आणि दुसऱ्या दिवशी नोकरीला लागले, असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते. तुमच्या लेकराने त्यांचाही बंदोबस्त केला, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना चिमटा काढला आहे. विदर्भातील मराठे शेतकरी म्हणून त्यांना आरक्षण तर आम्ही काय समुद्रात आहे का? आम्ही पण शेती करतो. जी जात मागास सिद्ध झाली ती जात मराठा आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. सगळे कामालाच लागलेत. माझ्या नादाला लागले की कार्यक्रम उलटा असतो… तुम्ही म्हटलं आरक्षणाला विरोध नाही म्हणून सोडलं, असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांना डिवचलं आहे. ॉ
भुजबळसाहेब म्हणाले होते, आमची 60 टक्के लोकसंख्या आहे. 60 टक्के ओबीसी आहे. तर 34 टक्के मराठे आहेत. तर 20 टक्के एससी एसटी आहेत. 150 टक्के लोकसंख्या असते का? मंडल कमिशनने दिलेलं 14 टक्के घ्या. आमचे आरक्षण आम्हाला द्या. आम्ही तुमचा द्वेष केला. तुमची जात बघितली नाही. मराठा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. तुमची प्रतिष्ठा कमी होऊ दिली नाही. ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा वाढवली. आम्ही तुम्हाला आपलं मानतो. आमच्या गोरगरीब पोरांवर वेळ तर तुम्ही आपलं मानायला तयार नाही, असं म्हणत जरांगेंनी छगन भुजबळांवर टीका केली.
ज्या मराठा आंदोलकावर हल्ला झाला. त्यांच्यावर आज मुंबईत शस्रक्रिया आहे. आमच्यावर हल्ला का केला? याचे उत्तर अजूनही दिलेलं नाही. ज्या माय माऊलीच्या अंगावर रक्त सांडलं होतं. त्या माय माऊलीने सांगितलं. आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही, असा निर्धारही जरांगे यांनी बोलून दाखलवला.