ती लग्न करायची, पैसे घेऊन पसार व्हायची, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली

| Updated on: Jul 11, 2023 | 9:20 PM

दुसऱ्याकडील पैसे तिच्या साथीदाराच्या बँक अकाउंटमध्ये गेले आहेत. आरोपी महिलेला तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ती लग्न करायची, पैसे घेऊन पसार व्हायची, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली
Follow us on

नाशिक : पुरुष महिलांना फसवतात, अशा तक्रारी असतात. पण, काही महिलाही फसवणुकीत मागे नाही. एक महिला स्वतःला अविवाहित असल्याचं सांगायची. एजंटांच्या माध्यमातून विवाह पक्का केला जायचा. लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरी यायची. त्यानंतर त्याच्याकडील रक्कम आणि सोने घेऊन पसार व्हायची. अशा एका महिलेस पोलिसांनी अटक केली. या महिलेने एकाच तालुक्यात दोघांसोबत लग्न केलं होतं. दोघांकडूनही रक्कम लंपास केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आता आणखी कुणाशी लग्न करून तिने फसवणूक केली का, याचा तपास पोलीस करत आहेत.

दोन्ही नवऱ्यांकडून लुटले पैसे

एका ठिकाणाहून अडीच लाख आणि एका ठिकाणाहून चार लाख रुपये घेतले. याशिवाय ८० ते ९० हजार रुपयांचे सोने गहाळ केले. पहिल्याकडील पैसे मिळाले नाही. दुसऱ्याकडील पैसे तिच्या साथीदाराच्या बँक अकाउंटमध्ये गेले आहेत. आरोपी महिलेला तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी मगर यांनी दिली.

 

त्या महाठग महिलेस अटक

एका महिलेने अविवाहित तरुणांना फसवून लग्न केलं. तीच महिला दुसऱ्या इसमासोबत पैसे घेऊन विवाहबद्ध होत असल्याची तक्रार आली. या तक्रारीनंतर तालुका पोलिसांनी त्या ठग महिलेस ताब्यात घेतले. विवाहाच्या नावाखाली अनेक अविवाहित तरुणांना फसवले जात असल्याची माहिती उघड झाली.

पोलिसांनी केले आवाहन

या विवाहा निमित्ताने लाखो रुपयांचे व्यवहार करत एका मुलीने अनेकांसोबत विवाह केला. मालेगाव, नाशिक आणि कोपरगाव येथील महिला आहेत. इतर जिल्ह्यातील मुलींच्या माध्यमातून हा व्यवसाय होत आल्याची माहिती उघड झाली आहे. अश्या घटना कुणाच्या बाबतीत या घटना घडल्या असतील तर त्यांनी मालेगाव पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.