नाशिक पोलीस झाले आणखी वेगवान, ताफ्यात आली 103 नवी वाहनं

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली बहुतांश वाहने ही महिला सुरक्षा निर्भया पथकांसाठी (Nirbhaya Pathak)  महिला अधिकारी यांना सूपूर्द करण्यात आली आहेत. डायल 112 ही कार्यप्रणाली सुद्धा लवकरच कार्यान्वित होत असून, या प्रणालीत मध्यवर्ती वॉर रूमच्या नियंत्रणाखाली ही सर्व वाहने असणार आहेत.

नाशिक पोलीस झाले आणखी वेगवान, ताफ्यात आली 103 नवी वाहनं
नाशिक पोलिसांच्या ताफ्यात नव्या गाड्या
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 5:29 PM

नाशिक : नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलास (Nashik Police) जिल्हा नियोजन समितीतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहनांची उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे नाशिक पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ लाभले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी  पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमत: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली बहुतांश वाहने ही महिला सुरक्षा निर्भया पथकांसाठी (Nirbhaya Pathak)  महिला अधिकारी यांना सूपूर्द करण्यात आली आहेत. डायल 112 ही कार्यप्रणाली सुद्धा लवकरच कार्यान्वित होत असून, या प्रणालीत मध्यवर्ती वॉर रूमच्या नियंत्रणाखाली ही सर्व वाहने असणार आहेत. प्रत्येक गाडीचे लोकेशन वॉर रूमला या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, घटनास्थळी जेथे दुर्घटना घडली असेल किंवा नागरिकांना पोलीसांची मदत हवी असेल अशा ठिकाणी  विनाविलंब  सिग्नलद्वारे यंत्रणेला सूचना मिळून पोलीसांची मदत वेळेत उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला सुरक्षा व्यवस्थेत चोखपणे काम करता येणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक पोलिसांचा वेग वाढला

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात चार जणांना वाहनांचे वितरण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज  पोलीस अधिक्षक कार्यालय येथील आपत्कालिन प्रतिसाद प्रणाली (MERS) कक्षास भेट दिली. या कक्षात डायल 112  कार्यप्रणाली संगणकप्रणालीद्वारे कसे चालते याची पाहणी केली. गुन्हे गारांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांकडे तेवढी वेगवान आाणि मजबूत वाहणं असणे गरजेच असते. पोलीस दलाला आणखी वेगवान बनवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वाहनांच्या सामील होण्याने नाशिक पोलिसांचा वेग आणखी वाढला आहे.

आज पोलीस अधिक्षक कार्यालय नाशिक (ग्रामीण) येथे अयोजित ग्रामीण पोलीस वाहनांचे वितरण कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेंकर, पोलीस निरीक्षक विशेष शाखा अकबर पटेल, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पंकज पवार, राखीव पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण,पोलीस निरीक्षक मिलिंद तेलुरे, जितेंद्र मोटर्स प्रा.ली. संचालक जितेंद्र शाह यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

गरज पडल्यास उद्धव ठाकरेंना ‘त्या’ होर्डिंग्जची आठवण करून देईन: महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज

अनिल बोडेंच्या अडचणी वाढल्या, नाना पटोलेंबद्दलचे ते वक्तव्य भोवणार?

कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय, अशोक चव्हाण यांचं संभाजी छत्रपतींच्या वक्तव्यावर उत्तर

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.