Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : नाशिकमधील 2 वादग्रस्त उड्डाणपूल, फाळके स्मारकाच्या बीओटी कामाला स्थगिती; भुजबळांची जोरदार बॅटिंग

नाशिक (Nashik) महापालिकेत लक्ष घालताच पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विषयांना हात घालत एक घाव दोन तुकडे करायला सुरुवात केलीय. त्यामुळे मायको सर्कल येथील उड्डाणपुलाचे (Flyover) काम थांबवल्याची घोषणा प्रशासक रमेश पवार यांनी केलीय. तर दुसरीकडे उंटवाडी येथील उड्डाणपुलाची व्यवहार्यता, निधीची तरतूद आणि गरज या निकषावर फेरविचार करा, अशा सूचना भुजबळ यांनी केल्यात. त्यामुळे या दोन्ही उड्डाणपुलाचे काम थंडबस्तात गेल्यात जमा आहे

Nashik : नाशिकमधील 2 वादग्रस्त उड्डाणपूल, फाळके स्मारकाच्या बीओटी कामाला स्थगिती; भुजबळांची जोरदार बॅटिंग
नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली.
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 2:56 PM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेत लक्ष घालताच पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विषयांना हात घालत एक घाव दोन तुकडे करायला सुरुवात केलीय. त्यामुळे मायको सर्कल येथील उड्डाणपुलाचे (Flyover) काम थांबवल्याची घोषणा प्रशासक रमेश पवार यांनी केलीय. तर दुसरीकडे उंटवाडी येथील उड्डाणपुलाची व्यवहार्यता, निधीची तरतूद आणि गरज या निकषावर फेरविचार करा, अशा सूचना भुजबळ यांनी केल्यात. त्यामुळे या दोन्ही उड्डाणपुलाचे काम थंडबस्तात गेल्यात जमा आहे. तर दुसरीकडे दादासाहेब फाळके स्मारकाच्या बीओटी कामालाही पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे कधीही महापालिकेत न फिरकरणाऱ्या भुजबळांनी ऐन निवडणुकीपूर्वी जोरदार बॅटिंग सुरू केल्याचे बोलले जात आहे. नाशिक शहरातील काही स्थळांचा विकास महापालिकेने स्वत: करावा. फाळके स्मारक बीओटी वर न देता ते महापालिकेने विकसित करावे, स्मारकाचा विकास करताना काही सल्लागाराच्या कल्पना मागवून त्यांच्या कडून आर्कषक रचना करावी. फाळके स्मारक विकसित करताना चित्रनगरीच्या धर्तीवर काही कल्पक करण्याचा विचार करावा, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी केले.

आढावा बैठक घेतली…

पालकमंत्री भुजबळांनी राजीव गांधी भवन येथे महापालिकेची आढावा बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,करुणा डहाळे,उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, गोदावरी संवर्धनचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त (कर) अर्चना तांबे, डॉ. दिलीप मेनकर, मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

घाटांची देखभाल करा…

सिंहस्थ कुंभमेळात सात ठिकाणी सुंदर घाटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व घाटांची नियमित देखभाल करण्यात यावी. कन्नमवार ते लक्ष्मीनारायण पुलाच्या दरम्यानचा घाट आणि तेथील मोकळ मैदानाचा वार चौपादी, प्रदर्शन, सभा, समारंभ,फेस्टीवल, कला, क्रिडा व इतर कार्यक्रमासाठी केल्यास शहराचे सौंदर्य अबाधित राहीत व पर्यटनात वाढ होवून महानगरपालिकेला शाश्वत उत्पन्न मिळेल.

आवश्यक तीच कामे करा…

नाशिक महापालिकेने शहराचा सर्वांगीण विकास शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून करावा. महापालिकेचे दायित्व दुपटीवर गेल्यामुळे आवश्यकता असलेलीच कामे करावी. शहरातील उड्डाणपूल व इतर विकास कामे आवश्यकतेनुसार करावी, जेणेकरून नाशिकची स्काय लाईन खराब होता कामा नये. तसेच महापालिकेतील मंजूर असलेली अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी अशा सूचनाही भुजबळांनी दिल्या आहेत.

महापालिकेत भरती प्रक्रिया…

महानगरपालिकेच्या अत्यावश्यक 695 पदांना मंजूरी आली आहे. सदरची पदे वैद्यकीय, पाणीपुरवठा व अग्निशमन विभागाची असून मंजुरी मिळालेल्या पदांची लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. नाशिक शहरात विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबविताना ते सुटसुटीत असावे. मुंबईतील शिवाजी मैदान जेवढे महत्वाचे तेवढेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) आहे. त्या मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे मोठे समारंभ घेण्यासाठी मैदान मोकळे राहण्यासाठी अनावश्यक बांधकाम टाळावे. तसेच नाशिक शहरात सर्वाधिक जॉगिंग ट्रक आहे. मात्र, खेळासाठी व मोठ्या सोहळ्यासाठी शहरात जागा सापडत नाही. त्यादृष्टीने मैदान विकसित करण्यात यावे, अशा सूचनाही केल्या.

नद्यांचे सौंदर्यीकरण करा…

नमामि गोदा प्रकल्प अंतर्गत गोदावरी, चार उपनद्या व 67 नाले प्रदूषण मुक्त करण्याबरोबर गोदावरी व इतर नद्यांचे सोंदर्यीकरण करावे. गोदावरी व नंदिनी नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच शहराच्या पाणी पुरवठा व सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, जेणेकरुन दूषित पाणी नदीत जाणार याची काळजी घ्यावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. तसेच अमृत २ योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.