Nashik-Pune railway : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी प्रती हेक्टरी मिळणार सव्वाकोटी; शेतकऱ्यांचा विरोध मावळणार का?
नाशिक-पुणे रेल्वेसाठी सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री, बारागावपिंप्री, वडझिरे, दातली, दोडी खुर्द आणि देशवंडी या गावात नाशिक-पुणे रेल्वेसाठी भूसंपादन केले जात आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीने येथील जमिनीचे दर निश्चित केले होते. मात्र, हे मूल्यांकन मूळ बाजारभावापेक्षा कमी दराने झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
नाशिकः बहुचर्चित नाशिक-पुणे (Nashik-Pune) रेल्वेसाठी सिन्नर (Sinnar) तालुक्यात भूसंपादन केले जात आहे. त्यासाठी बागायती जमिनींचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारागाव प्रिंप्रीतील बारमाही बागायती जमिनीसाठी प्रती हेक्टरी 1 कोटी 25 लाख 28 हजार 130 रुपये मिळणार आहेत. याच ठिकाणी हंगामी बागायत जमिनीसाठी प्रती हेक्टरी 93 लाख 93 हजार 097 रुपये, तर जिरायत जमिनीसाठी प्रती हेक्टरी 62 लाख 64 हजार 065 रुपये मिळणार आहेत. पाटपिंप्री येथील शेतकऱ्यांना (Farmers) जिरायत जमिनीसाठी प्रती हेक्टरी 55 लाख 61 हजार 465 रुपये मिळणार आहेत. तर वडझिरे येथील शेतकऱ्यांना जिरायत जमिनीसाठी प्रती हेक्टरी 57 लाख 64 हजार 065 रुपये आणि हंगामी बागायत जमिनीसाठी प्रती हेक्टरी 86 लाख 46 हजार 097 रुपये मिळणार आहेत. हंगामी बागायतीसाठी जिरायती जमीन दराच्या दीडपट आणि बारमाही बागायतीसाठी दुप्पट मूल्यांकन जाहीर करण्यात आले आहे. या मूल्यांकनाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
नाराजी दूर होणार का?
सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री, बारागावपिंप्री, वडझिरे, दातली, दोडी खुर्द आणि देशवंडी या गावात नाशिक-पुणे रेल्वेसाठी भूसंपादन केले जात आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीने येथील जमिनीचे दर निश्चित केले होते. मात्र, हे मूल्यांकन मूळ बाजारभावापेक्षा कमी दराने झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर आता हंगामी, बागायती सारेच दर शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. आता येथील शेतकरी विरोधाची भूमिका मवाळ करणार की, आंदोलन तीव्र होणार हे पाहावे लागेल.
कामासाठी निधी उपलब्ध
रेल्वेमार्गाच्या कामातील सर्वात मोठा निधीचा अडथळा दूर झालाय. या कामासाठीच्या आपल्या हिश्शाच्या 32 कोटी निधीला यापूर्वीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही आपल्या हिश्शाच्या 20 टक्के पैकी 19.6 टक्के निधीला मान्यता दिली आहे. त्यातही विशेष म्हणजे समभागातून 60 टक्के निधी उपलब्ध आहे.
कसा आहे प्रकल्प?
– 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
– रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
– रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
– पुढे हा वेग 250 कि. मी. पर्यंत वाढविणार
– पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
– वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प
– पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
– 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!