नाशिक येथील अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून होणार चौकशी; आज, उद्या अनेक गाड्या रद्द

नाशिक जवळच्या देवळाली ते लहवी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावरून घसरली. या ठिकाणी ट्रॅक रिपेअरिंगच्या कामाला अतिशय वेगात सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच हे काम मार्गी लागणार असून, सर्व गाड्या पूर्ववत धावतील, असे रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

नाशिक येथील अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून होणार चौकशी; आज, उद्या अनेक गाड्या रद्द
नाशिक जवळच्या देवळाली ते लहवी स्थानकादरम्यान ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू आहे.
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:54 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जवळच्या देवळाली ते लहवी स्थानकादरम्यान रविवारी झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनच चौकशी केली जाणार आहे. तर दुसरीकडे रेल्वे अपघातामुळे पंचवटी एक्स्प्रेसह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन एसटी संपात प्रवाशाला मोठा फटका बसणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनिल जयनगर पवन एक्स्प्रेस (Pawan Express)चे चार डबे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू (Death) झाला असून पाच प्रवासी जखमी (Injured) झाले आहेत. रेल्वेतील एलएचबी या जर्मन तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून घसरली तरी डबे एकमेकांवर आदळत नाहीत. ते विलग होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. अधिकचे नुकसान टळते. त्याचाच प्रत्यय नाशिक येथील अपघातात आला. मात्र, हा अपघात कसा झाला याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. लवकरच रेल्वेतर्फे या अपघाताबाबत ठोस माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, या अपघाताने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवासांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आहे.

रद्द केलेल्या गाड्या

नाशिक येथील अपघातामुळे 8 गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यात पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस,12146 पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस,12111 मुंबई – अमरावती एक्स्प्रेस, 12112 अमरावती – मुंबई एक्स्प्रेस, 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, 17612 मुंबई – नांदेड एक्स्प्रेस,17611 नांदेड – मुंबई एक्स्प्रेस, 17617 – नांदेड – मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे.

गाड्यांचे मार्ग बदलले

रेल्वे अपघातामुळे 10 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यात त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपूर मुंबई – हावडा एक्स्प्रेस, मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटणा एक्स्प्रेस दौंड यासह इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. लवकरच रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत होईल, अशी शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

ट्रॅक दुरुस्ती सुरू

नाशिक जवळच्या देवळाली ते लहवी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावरून घसरली. या ठिकाणी ट्रॅक रिपेअरिंगच्या कामाला अतिशय वेगात सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच हे काम मार्गी लागणार असून, सर्व गाड्या पूर्ववत धावतील, असे रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे. मात्र, या अपघातामुळे प्रवाशांची कोंडी झालीय. एकीकडे एसटी बंद आहेत. आता दुसरीकडे रेल्वे बंद असल्याने त्यांचे हाल होतायत.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.