Malegaon | मालेगावात पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची झाली चाळण, सार्वजनिक बांधकाम विभाग मूग गिळून गप्पच…
वैद्य हॉस्पिटल ते स्टेट बँकपर्यंतच्या रोडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सोयगाव मार्केट, नव वसाहत, तसेच मालेगावातल्या अनेक मुख्य रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे. एवढेच काय तर हजारो वाहने ये जा करत असतात.
मालेगाव : पहिल्याच पावसामध्ये मालेगावातील (Malegaon) रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. नागरिकांना रस्त्याने हातात जीव घेऊन ये जा करण्याची वेळ आलीयं. मालेगावातल्या रस्त्यावरून प्रवास करत असताना अनेक नागरिकांना असा प्रश्न पडतो की आपण रस्त्यावरून प्रवास (Travel) करतोय की खड्ड्यातूनच. शहरातील कोणत्याही भागातील रस्ते ही खड्डे विरहित नाहीत. अनेक भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे चित्र पहावयास मिळतंय. मनपाकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्ते दुरुस्ती करणे अपेक्षित (Expected) होते.
मालेगावातील रस्त्यांची झाली चाळण
पावसाळा तोंडावर असताना देखील कोणत्याही उपायोजना न केल्याने पहिल्याच पावसात मनपाचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील साठ फुटी रोड ते कॉलेज स्टॉपपर्यंतच्या रोडवर मोठमोठाले खड्डे पडले असून, वाहन चालकांना गाडी चालवतांना मोठी कसरत करावी लागते आहे. याच ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे, या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, शिवाय पेट्रोल पंप शेजारील बिल्डिंगमध्ये खाजगी क्लासेस असल्याने या क्लासेसचे हजारो विद्यार्थी आपली वाहने रस्त्यावरच पार्क करत असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो.
रस्त्यांवर मोठे खड्डे नागरिकांचा जीव धोक्यात
वैद्य हॉस्पिटल ते स्टेट बँकपर्यंतच्या रोडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सोयगाव मार्केट, नव वसाहत, तसेच मालेगावातल्या अनेक मुख्य रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे. एवढेच काय तर हजारो वाहने ये जा करत असतात. मोसमपूल भागात असलेल्या शहर वाहतूक कार्यालयाच्या समोरच रस्त्यावर दोन मोठे खड्डे असून वाहने या खड्यात जोरात धडकतात. यामुळे नागरिकांना मानेला कमरेला हिसका बसून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.