Nashik rice scam | तांदूळ घोटाळाप्रकरणी बचत गटाची अनामत गोठवली; करार रद्द करण्याचे आदेश

स्वामी विवेकानंद संस्थेकडे 14 हजार किलो अवैध तांदूळ साठा सापडलाय. त्यांच्याकडून शासकीय दराने प्रति किलो 38 रुपये 74 पैसे प्रमाणे याची वसुली करावी. करारनामा आणि कार्यारंभ आदेश रद्द करावा. विवेकानंद संस्थेची अनामत रक्कम जप्त करून कळवावे असे आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत.

Nashik rice scam | तांदूळ घोटाळाप्रकरणी बचत गटाची अनामत गोठवली; करार रद्द करण्याचे आदेश
नाशिकमध्ये स्वामी विवेकानंद संस्थेच्या गोदामात दडवून ठेवलेला तांदळाचा साठा.
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 10:10 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोषण आहारातील तांदूळ (Rice) हडपल्याप्रकरणी स्वामी विवेकानंद महिला बचतगटाची अनामत गोठवण्यात आली आहे. शिवाय या बचतगटासोबतचा करारनामा रद्द करण्याचे आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम देण्यात आले होते. पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे हे काम देण्यात आले. मात्र, कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 14 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारला होता. याची माहिती महिला बचत गटाला समजली. तेव्हा त्यांनी तपासणीसाठी आलेल्या प्राथमिक शिक्षण संचालयाच्या पथकाला माहिती दिली. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. शेवटी त्यांनी महापालिकेच्या (Municipal Corporation) शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कैफियत मांडली. तेव्हा धनगर यांनी या ठिकाणी धडक देत हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. विशेष म्हणजे हा तांदूळ आपलाच असल्याची कबुली कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने शिक्षणाधिकाऱ्यांना दिली होती.

काय होती शिफारस?

नाशिकमधील तांदूळ घोटाळ्याची जिल्हा परिषद आणि महाालिकेच्या चार सदस्यीय शिक्षण समितीने चौकशी केली. समितीने प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. कंत्राटदाराची चौकशी केली. त्यांनंतर स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराने तांदूळ साठा दडवल्याचा निष्कर्ष काढला. या प्रकरणी या संस्थेचा करार रद्द करावा. त्यांच्याकडून शासकीय दराने शिल्लक तांदळाची वसुली करावी. त्यांना भविष्यात अन्न शिजवून पुरवठाण करण्यासह इतर कोणतेही काम देऊ नये. संस्थेच्या अनामत रकमेसह इतर सर्व जमा शासनदरबारी जमा करावी, अशी शिफारस करण्यात आली होती.

कारवाईचा अहवाल मागवला

प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी हे प्रकरण वर्ग करावे. संबंधित संबंधित संस्थेविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत. स्वामी विवेकानंद संस्थेकडे 14 हजार किलो अवैध तांदूळ साठा सापडलाय. त्यांच्याकडून शासकीय दराने प्रति किलो 38 रुपये 74 पैसे प्रमाणे याची वसुली करावी. करारनामा आणि कार्यारंभ आदेश रद्द करावा. विवेकानंद संस्थेची अनामत रक्कम जप्त करून कळवावे असे आदेश दिले आहेत.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.