बाळासाहेब ठाकरे यांची शपथ धेऊन सांगतो; बावनकुळेंच्या ‘त्या’ फोटोवर संजय राऊत यांचा सर्वात मोठा खुलासा

Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule Photo in Macau Casino and Sudhakar Badgujar Karvai : चंद्रशेखर बावनकुळे यांचा माकाऊतील फोटो अन् सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईवर संजय राऊत यांचा सर्वात मोठा खुलासा, खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

बाळासाहेब ठाकरे यांची शपथ धेऊन सांगतो; बावनकुळेंच्या 'त्या' फोटोवर संजय राऊत यांचा सर्वात मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 12:41 PM

चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, नाशिक | 24 डिसेंबर 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊत यांनी काही दिवसांआधी शेअर केला होता. हा फोटो चीनमधल्या मकाऊ शहरातील होता. यानंतर बावनकुळे मकाऊत कसिनो खेळत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली. हा फोटो ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना दिल्याचं बोललं जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी मोठा खुलासा केलाय.

“बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो…”

आमची जी माहिती आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील व्हीडिओ सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं बोललं जातंय. कुठलातरी व्हीडिओ कुणीतरी दिला. म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई होणं चूक आहे. आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात तो व्हीडिओ बडगुजर यांच्या कुटुंबाने दिलाच नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो. बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहे. त्यांची मी कधी शपथ घेत नाही. पण आज त्यांची शपथ घेऊन सांगतो. त्या व्हीडिओशी सुधाकर बडगुजर यांचा काहीही संबंध नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

बावनकुळे यांचा व्हीडिओ कुणी दिला?

भाजपच्या लोकांनी आपआपसात विचारलं पाहिजे बावनकुळे यांचा हा व्हीडिओ कुणी दिला ते… त्यांना चांगलंच माहिती आहे की बावनकुळे यांचा व्हीडिओ नेमका कुणी दिला. हा व्हीडिओ आमच्यापर्यंत कसा आला हे भाजप आणि संघ परिवाराला माहिती आहे. विशेषत: नागपूरच्या लोकांना माहिती आहे की, हा व्हीडिओ आम्हाला कुणी दिला ते… विनाकारण बडगुजर कुटुंबावर आरोप करू नका, असं संजय राऊत म्हणालेत.

23 जानेवारी ठाकरे गटाचा नाशकात मेळावा

23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा राहणार आहेत. या मेळाव्यासाठी जागानिश्चिती आणि पूर्वतयारीसाठी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आज नाशकात आहेत. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान खासदार संजय राऊत हे काल रात्रीच नाशिकमध्ये दाखल झालेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गटाला ऊर्जा मिळण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.