उद्धवजींच्या मानेचा पट्टा बघण्या पेक्षा, तुमच्या गळ्यातला गुलामीचा पट्टा बघा!; संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Sanjay Raut on Devendra Fadnavis Statement About Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यांच्या या विधानाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

उद्धवजींच्या मानेचा पट्टा बघण्या पेक्षा, तुमच्या गळ्यातला गुलामीचा पट्टा बघा!; संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 1:05 PM

चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 08 जानेवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी मानेच्या पट्ट्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. फडणवीसांच्या या विधानाबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. तसंच तलाठी भरती प्रकरणावरूनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

परिस्थितीनुसार नाटक आणि सिनेमाची आठवण येते. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा पाहिला की, सिंहासन सिनेमाची आठवण येते. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल बोलतोय. हे सांगण्याची आवश्यकता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या मंचावरून फडणवीसांनी हा टोला लगावला.

राऊतांचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं आहे. यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधेलला आहे. मानेवर पट्टा असेल तर तो आजार आहे. असा आजार कुणालाही होऊ शकतो. अमित शाह देखील आजारी असतात. नरेंद्र आजारी पडू शकतात. पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीच्या पट्टा आहे. तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधलाय. दिल्ली त्यांना खेळवत बसलीये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

“2024 नंतर नाटकं हेच करायचं”

देवेंद्र फडणवीस यांनी याच कार्यक्रमात आणखी एक विधान केलं. ‘2019 साली आमच्या पाठीत कट्ट्यार घुसली’ असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानावरही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांना 2024 नंतर नाटकं हेच करायचं आहे, त्यांना दुसरं काम काय आहे?, असं राऊत म्हणाले.

तलाठी भरती प्रकरणावरूनही राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला. पुरावा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी वाचवा. सत्य हा पुरावा आहे. संघ परिवार जर सत्य हा पुरावा मानत नसतील, तर त्यांनी कबर खोदावी. त्यांना काय पुरावे हवे आहे? उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही मराठे असल्याचे पुरावे द्या, असंही राऊतांनी म्हटलंय.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.