2019 च्या सरकारस्थापनेवेळी गुडगावच्या हॉटेलमध्ये…; दिंडोरीतून शरद पवारांचा नरहरी झिरवळांवर निशाणा

Sharad Pawar on Narhari Zirwal : शरद पवार यांनी नरहरी झिरवळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी नाशिकच्या दिंडोरीतील सभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांनी 2019 च्या सरकार स्थापनेवेळच्या घटनेवर भाष्य केलं. वाचा सविस्तर बातमी...

2019 च्या सरकारस्थापनेवेळी गुडगावच्या हॉटेलमध्ये...; दिंडोरीतून शरद पवारांचा नरहरी झिरवळांवर निशाणा
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 3:25 PM

नाशिकच्या दिंडोरीत आज शरद पवारांच्या सभा झाली. नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात शरद पवार काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा झाली. यावेळी नरहरी झिरवळ यांच्यावर शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला आहे. 2019 चा पहाटेचा शपथविधी आणि सत्तास्थापनेच्या वेळचा एक किस्सा शरद पवारांनी सांगितला. झिरवाळ इथे आहेत ना… कोण झिरवाळ ना त्यांना टिकीट आम्ही दिले त्यांना सत्तेत आम्ही आणले. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोणाला करायचे मी सांगितले आदिवासी समाजाला नाशिक जिल्ह्याला… त्यांना उपाध्यक्ष केलं. त्यातील काही लोक पळून गेले सोडून गेले, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

दिल्लीला काही लोक पाठवले दिल्लीला नाही. गुडगावला हॉटेलला पाठवले आणि तिथे खोलीत आमच्या काही कार्यकर्त्यांना घुसायला सांगितलं. नरहरी झिरवळ तिथं सिनेमा बघत होते. महाराष्ट्र विधानसभेचे काम करण्यासाठी. हे सगळं काम सोडून हा ग्रस्त त्या ठिकाणी गुडगावला तिथून परत पाठवलं सांगितले परत चूक होणार नाही म्हटलं काही हरकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

गरीब माणूस आहे. आदिवासी माणूस आहे चूक झाली असेल आपण पोटात घेऊया. पहिले 40-45 आमदार निघून गेले. त्याचे नेतृत्व शिंदेंनी केले आणि परत चाळीस गेले झिरवाळ पण गेले. लोकांनी सत्ता दिली अधिकार दिला. पण अशा माणसावर काही भरोसा ठेवायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

झिरवळांचं प्रत्युत्तर

शरद पवारांनी झिरवाळांवर निशाना साधल्यानंतर आता नरहरी झिरवळ यांनी याला प्रत्युत्तर दिलं आहे.आम्ही सर्व एकत्र असताना त्यांनी उपाध्यक्ष केलं होतं. साहेबांनी नाही केलं असं मी म्हणणार नाही. हे सर्व करण्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा होता. परंतु राज्यातील सत्ता संघर्षाच्या घडामोडीच्या काळात पक्ष फुटीमध्ये मला माझं पद जाईल असं वाटलं होतं. पण तसं झाले नाही. फडणवीस शिंदे अजिददादांमुळे पद राहीलं. म्हणून मी आजच्या तळेघर येथील सभेत पवार साहेबांचं नाव घ्यायचं टाळलं, असं झिरवळ म्हणाले. ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील तळेघर इथं बोलत होते.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.