मोठी बातमी : ठाकरे गटाचा ‘या’ ठिकाणी स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीत बिघाडी?

Nashik Shivsena Uddhav Thackeray Group Meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली. वाचा सविस्तर...

मोठी बातमी : ठाकरे गटाचा 'या' ठिकाणी स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीत बिघाडी?
राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 12:44 PM

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे महाविकास आघाडीतील पक्ष या पराभवाचं मंथन करत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अशातच आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा

येणाऱ्या काळात निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराजी आहे. आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गट स्वतंत्रपणे लढल्याने शंभर टक्के यश येईल अशी शिवसैनिकांना खात्री असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटलं आहे महानगर प्रमुखांची माहिती आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना मागणी करणार आहे, असं शिंदे म्हणाले.

ठाकरे गटाच्या खासदाराला गावबंदी

नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गद्दारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीत असताना महायुतीच्या उमेदवाराचं काम केल्याचा आरोप वाजे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सिन्नरच्या वडझिरे गावात झळकला खासदारांना गावबंदीचा फलक लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी खासदारांना गावबंदीचा फलक लावला आहे. ग्रामपंचायतीने तासाभरात खासदारांना गावबंदीचा फलक हटवला आहे. मात्र फलकामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांना त्यांच्याच गावात गाव बंदी करण्यात आली आहे. ‘गद्दार खासदार राजाभाऊ वाजे’ असा गाव बंदी बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. राजाभाऊ वाजे यांच्या गावासह तीन ते चार गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबीयाना सिन्नर तालुक्यात करण्यात गावबंदी आली आहे. महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे त्यांच्या बॅनरवर राजाभाऊ वाजे यांचे फोटो झळकले. त्यामुळे महाविकास आघाडीत असताना महायुतीकडून काम केल्याचा आरोप करत वाजे यांना गावबंदी करण्यात आला आहे.

मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.