Nashik | दिंडोरीच्या तिरंगा रोषणाईने लक्ष वेधले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनोखी संकल्पना …
देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. यानिमित्त्याने शासकिय कार्यालयांना खास विद्युत रोषणाई करण्यात आलीयं. दिंडोरीच्या प्रांत अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांना खास खास विद्युत रोषणाई करण्यात आली.
मालेगाव : देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची धूम सुरू असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन (Organized) करण्यात आलयं. नाशिकच्या दिंडोरीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रांत अधिकारी डॉक्टर संदीप आहेर व तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयावर राष्ट्रध्वजावरील तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई (Electric lighting) करण्यात आलीयं. या रोषणाई दोन्ही इमारती उजळून निघाल्या तर या आकर्षक (Attractive) रोषणाईने दिंडोरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटली आहे.
दिंडोरीच्या शासकिय कार्यालयांना खास विद्युत रोषणाई
देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. यानिमित्त्याने शासकिय कार्यालयांना खास विद्युत रोषणाई करण्यात आलीयं. दिंडोरीच्या प्रांत अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांना खास खास विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही विद्युत रोषणाई बघण्यासाठी संध्याकाळच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. इतकेच नाही तर मोठ्या प्रमाणात नागरिक इमारतीसमोर फोटो देखील घेत होते.
प्रांत कार्यालय आणि तहसिल कार्यालयाच्या तिरंगा रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधले
देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास विद्युत रोषणाई करण्यात आलीयं. हर घर तिरंगा मोहिम देखील आजपासून सुरू झालीयं. शहरातील जवळपास सर्वच घरांवर तिरंगे लावण्यात आले आहेत. विशेष: दिंडोरीच्या प्रांत कार्यालय आणि तहसिल कार्यालयाच्या तिरंगा रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रांत अधिकारी डॉक्टर संदीप आहेर व तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विद्युत रोषणाई करण्यात आलीयं.