Nashik : नाशिकमध्ये नवउद्योजक, तरुणांसाठी संधीची कवाडे उघडी; काय आहे कार्यक्रम, कसे व्हाल सहभागी?
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://cs.co/CLAPMaharashtra या दुव्यावरून इच्छुकांनी अर्ज सादर करावयाचे आहेत. आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तरूणांना स्टार्ट-अप , व्यवसाय- उद्योजकांसाठी आधारित ज्ञान सत्र आणि तंत्रज्ञान माहितीचे आयोजन केले जाणार आहे.
नाशिकः कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत स्थापन झालेल्या महाराष्ट्र नाविन्यता सोसायटी मार्फत तरुण (Youth) व नवोदित उद्योजकांना (Entrepreneur) नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित ‘ज्ञान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून; यात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता अनिसा तडवी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिस्को लाँचपॅड (Cisco Launchpad) यांच्या सहकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्युअरशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्ती अंतर्गत हे आयोजन करण्यात येत आहे. उद्योग आणि पर्यावरणातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 25 एप्रिल ते 29 एप्रिल 2022 आणि 2 मे ते 6 मे, 2022 या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त तरुण आणि नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कसे व्हाल सहभागी?
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://cs.co/CLAPMaharashtra या दुव्यावरून इच्छुकांनी अर्ज सादर करावयाचे आहेत. आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तरूणांना स्टार्ट-अप , व्यवसाय- उद्योजकांसाठी आधारित ज्ञान सत्र आणि तंत्रज्ञान माहितीचे आयोजन केले जाणार असून या व्यासपीठावर नवोदित उद्योजकांना त्यांच्या कल्पना संबंधित भागधारकांपर्यंत पोहचविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
काय शिकायला मिळेल?
कार्यक्रमात उत्पादन विकास, डिझाइन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा उभारावा यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नवोदित आणि उद्योजकांना त्यांची कल्पना कशी तयार करावी, टिकवून ठेवावी, विस्तारित व्हावे आणि मोठे कसे करावे याचे ज्ञान दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी technopreneurship@cisco.com ई-मेलवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!