Nashik Murder Mystery| डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून पतीनेच केला, हाडांचा डीएनए जुळताच संदीप वाजेंना बेड्या!
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळातही त्यांनी अग्रक्रमाने कामगिरी बजावली होती. 25 जानेवारी रोजी मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ओपीडीमध्ये काम केले. मात्र त्याच रात्रीपासून त्या बेपत्ता झाल्या होत्या.
नाशिक: शहरातील बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे खून (Dr. Suvarna waje) प्रकरणाचा तब्बल दहा दिवसांनंतर उलगडा (Murder mystery) झाला असून हा खून त्यांचे हती संदीप वाजे यांनीच केल्याचे समोर आले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीनेच कौटुंबिक वादातून अतिशय थंड डोक्याने ही हत्या घडवून आणल्याचे गुरुवारी पोलिसांच्या तपासात उघड झाले. 25 जानेवारीच्या रात्रीपासून डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता होत्या. त्याच रात्री रायगडनगरजवळ वाजे यांची गाडी जळालेल्या अवस्थेत आढळली होती. तसेच कारमध्ये मानवी हाडेही आढळली होती. हाडे नेमकी कुणाची आहेत, याचा उलगडा झाल्यानंतरच हत्या प्रकरणातील आरोपी उघड होणार होता. अखेर डीएनए अहवालानंतर ही हाडे डॉ. सुवर्णा वाजे यांचीच असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून त्यांचे पती संदीप वाजेंना (Sandeep Waje) बेड्या ठोकल्या.
जळालेल्या हाडांचा डीएनए जुळला
कारमध्ये आढळलेली मानवी हाडे नेमकी कुणाची आहेत, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. अखेर डीएनए अहवालानंतर ती हाडे वाजे यांचीच असल्याचे उघड झाले. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या माहेरील नातेवाईकांच्या जबाबावरून पोलिसांनी संशयित त्यांचे पती संदीप यांना गुरुवारी बेड्या ठोकल्या. नाशिक ग्रामीणच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी संदीप वाजे यांच्यासह अन्य पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरीत साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
दहा दिवसांपूर्वी काय घडलं?
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळातही त्यांनी अग्रक्रमाने कामगिरी बजावली होती. 25 जानेवारी रोजी मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ओपीडीमध्ये काम केले. मात्र त्याच रात्रीपासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्साठी डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडल्याचे निष्पन्न झाले.
इतर बातम्या-