Nashik | शिंदे – फडणवीस सरकारचा नाशिककरांना मोठा दणका, अमृत संस्थेचे मुख्यालय हलवले पुण्यात…
महाविकास आघाडी सरकारने नाशिकमध्ये अमृत संस्थेच्या मुख्यालयाला मंजूरी दिली होती. मात्र, यामध्ये बदल करत आता शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत. नाशिकमध्ये मंजूर असलेले अमृत संस्थेचे मुख्यालय पुण्याला हलवले आहे.
नाशिक : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. शिंदेंनी आपल्यासोबत तब्बल 40 घेत मोठी बंडखोरी केली. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने (BJP) सत्तास्थापन केली. सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले. आता सरकारने नाशिककरांना मोठा दणका दिलायं. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले अमृत संस्थेचे मुख्यालय आता पुण्यात (Pune) हलवण्यात आलंय.
महाविकास आघाडी सरकारने नाशिकमध्ये अमृत संस्थेच्या मुख्यालयाला दिली होती मंजूरी
महाविकास आघाडी सरकारने नाशिकमध्ये अमृत संस्थेच्या मुख्यालयाला मंजूरी दिली होती. मात्र, यामध्ये बदल करत आता शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत. नाशिकमध्ये मंजूर असलेले अमृत संस्थेचे मुख्यालय पुण्याला हलवले आहे. शिंदे फडणवीस सरकारने मुख्यालय पुण्यात हलवत पुणेकरांना खुश करण्याचा प्रयत्न केलायं. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकारवर नाशिकमधून जोरदार टिका केली जातंय.
24 तासांपूर्वी शासन निर्णय जारी, नाशिककरांना मोठा धक्का
3 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलायं. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध उपक्रमांसाठी अमृत संस्था कार्यरत होणार आहे. अमृतचे कार्यालय पुण्यात हलवल्याने नाशिकमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.