Nashik | उत्तर महाराष्ट्रात 3 दिवस उष्णतेची लाट; विदर्भाचीही होणार लाही लाही…!

| Updated on: Mar 20, 2022 | 9:39 AM

पुढचे तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला या जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जाणवणार आहे. विशेषतः गुजरातमध्येही तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Nashik | उत्तर महाराष्ट्रात 3 दिवस उष्णतेची लाट; विदर्भाचीही होणार लाही लाही...!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिकः नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला (North Maharashtra) पावसाने बेभान झोडपल्यानंतर आता उन्हाळ्यात उष्णतेचा कहर अनुभवायला मिळतोय. आगामी तीन दिवस या भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असून, विदर्भाचीही (Vidarbha) लाही लाही होणार आहे. निसर्गाच्या या तांडवापुढे मानव पुन्हा एकदा हतबल झालेला दिसून येतोय. सध्या अंदमानच्या दक्षिण दिशेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उद्या सोमवारी 21 मार्च रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणारय. मंगळवारी 22 मार्च रोजी ते म्यानमार आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीवर आदळायची शक्यता आहे. त्यानंतर अंदमानात तीनेक दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र मात्र उष्णतेच्या लाटेत होरपळून निघणार आहे. पुढचे तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला या जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जाणवणार आहे. विशेषतः गुजरातमध्येही तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही ठिकाणी पाऊसही

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 19 ते 21 मार्च या काळात विदर्भातील काही भाग जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तर पश्चिम महाराष्ट्रातील उष्णतेची लाट सोमवारपासून कमी होण्याची शक्यता आहे.

का बसतायत असे तडाखे?

यंदा पावसाने उभ्या महाराष्ट्राला झोडपडून काढले. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यात तर पाच वेळा गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. इतकेच नव्हे तर रब्बीचे पीक हाता-तोडांशी आले असतानाही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे सारे परिणाम हवामान बदलाचे आहेत, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यातून वाचण्यासाठी निसर्गाचे संवर्धन हा एकमेव मार्ग प्रत्येकासमोर आहे.

घराबाहेर पडणे टाळावे

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तीन दिवस उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळे भर दुपारी नागरिकांंनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. खूप तातडीचे काम असेल, तर डोक्यावर टोपी, रूमाल किंवा छत्री असू द्यावी. उन्हाळ्यात थंड पेयाचे सेवन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!