Nashik : नाशिकमध्ये आमदार बनले वाहतूक पोलीस; राहुल ढिकलेंनी फोडली 2 तासांची कोंडी…!
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार अॅड. राहुल ढिकले हे स्वतः वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. मात्र, यावेळी एकही वाहतूक पोलीस या भागात दिसत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस गेले कुठे, असा सवाल आता निर्माण होत आहे.
नाशिकः नाशिकच (Nashik) काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात अगदी तालुक्यातही वाहतूक कोंडीचा अनुभव वारंवार येतो. वाढलेली वाहने. प्रत्येकाला समोर जाण्याची घाई आणि त्यातही वाहतूक नियमांचा पडलेला विसर. यामुळे वाहतूक कोंडी आपल्या पाचवीला पुजलेली. नाशिकमध्येही नेमके तसेच झाले. औरंगाबाद रोड परिसरात तब्बल दोन तासांपासून वाहतूक तुंबली होती. शेवटी आमदार अॅड. राहुल ढिकले (Rahul Dhakale) यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी (Traffic jam) सोडवली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचे झाले असे की, नाशिकमधील औरंगाबाद रोड परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यात वेळ रात्रीची. प्रत्येक जणाची या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झालेली. त्यामुळे कोंडीचा विळखा आणखी घट्ट झाला. त्यातून बाहेर पडणे महामुश्किल होऊन बसले. ही माहिती आमदार ढिकले यांना कळाली. त्यांनी थेट औरंगाबाद रोड परिसरात धाव घेतली. रस्त्यावरून उतरून त्यांनी वाहतूक कोंडी सोडवली. त्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.
पोलीस गेले कुठे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार अॅड. राहुल ढिकले हे स्वतः वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. मात्र, यावेळी एकही वाहतूक पोलीस या भागात दिसत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस गेले कुठे, असा सवाल आता निर्माण होत आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि कोंडी होणाऱ्या चौकात तरी वाहतूक पोलीस असावेत. मात्र, ऐन मोक्याच्या वेळी ते गायब होत असतील, तर कसे असा सवालही यानिमित्ताने होत आहे.
नियम पाळावेत
वाहतूक कोंडी टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अगदी सिग्नल न तोडणे, डाव्या बाजूने जाणे इथपासून ते रॉंगसाइड घुसू नये इथपर्यंत. हे नियम साधे असतात. आपल्याला माहितीही असतात. मात्र, आपण त्यांचे पालन केले नाही, तर असेच होणार. व्यवस्थाही कितीही सुधारली. तंत्रज्ञान कितीही पुढारलेले असू द्या. नियमांचे पालन केले, तरच त्याचा उपयोग होणार, हे ध्यानात ठेवावे लागेल. इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!