नाशिकच्या त्रंबकेश्वरला आता ब्रह्मगिरीचाच धोका; पर्वतरांगांमध्ये भूस्खलन; दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे आणखी तडे
नाशिकः राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी नैसर्गिक दुर्घटना घडण्याच्या घटना सुरूच आहेत. कोकणात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र रस्त्या कडने असणाऱ्या घाटातील कडा धोकादायक अवस्थेत असल्याने प्रशासनाकडून धोक्याच्या सूचना देण्यात आल्या असून महत्वाच्या मार्गावरील वाहतून एकेरी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे, कोकणाप्रमाणेच नाशिकमध्येही […]
नाशिकः राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी नैसर्गिक दुर्घटना घडण्याच्या घटना सुरूच आहेत. कोकणात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र रस्त्या कडने असणाऱ्या घाटातील कडा धोकादायक अवस्थेत असल्याने प्रशासनाकडून धोक्याच्या सूचना देण्यात आल्या असून महत्वाच्या मार्गावरील वाहतून एकेरी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे, कोकणाप्रमाणेच नाशिकमध्येही (Nashik) धोक्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) शहराला आता ब्रह्मगिरीचाच धोका असल्याचे दिसत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील महत्वाचा आणि मोठा असलेला दुसऱ्या नंबरच डोंगर आणि सुळका आहे.
मात्र आता या ब्रह्मगिरीच्या (Brahmagiri) कडानांच तडे गेल्यामुळे आता त्र्यंबकेश्वर शहरालाच आता ब्रह्मगिरीचाच धोका असल्याचे बोलले जात आहे.
मोठ्या प्रमाणात भूस्खलन
गेल्या काही दिवसांपासून ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. त्यामुळेच हा धोका असल्याचे सांगितले जात आहे, पावसाळ्याच्या दिवसाता अनेक ठिकाणाच्या पहाडी परिसरातील डोंगरांना तडे जाऊन कोसळले आहेत. रायगड, महाड आणि कोकणातील अनेक रस्त्याशेजारील डोंगर कोसळून रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे ब्रह्मगिरी डोंगराच्या कडाना तडे गेल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.
मेटघर किल्ला, जांभाची वाडीला धोका
गेल्या अनेक दिवसांपासून या डोंगरावरील वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे त्र्यंबकेश्वर नगरीला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. या डोंगराच्या कडांना तडे गेल्यामुळे मेटघर किल्ला, जांभाची वाडी ही धोक्याच्या छायेखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भुकंपामुळे तडे आणखी वाढले
गेल्या अनेक दिवसांपासून या डोंगराच्या कडांना तडे गेले असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या भुकंपामुळे हो डोंगरावरील तडे आणखी वाढल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. कडांना भुकंपानंतर मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.