नाशिकमध्ये शेततळ्यात पडून 2 सख्या भावांचा मृत्यू; लोणवाडी परिसरात हळहळ
मुलांचे हे हाकनाक मृत्यू टाळता येऊ शकतात. पालकांनी आपले मूल खेळायला कुठे जात आहे, यावर जरूर लक्ष ठेवावे. शक्यतो मुलांना घराबाहेर खेळायला पाठवताना एकट्याला पाठवू नये. त्याच्यासोबत कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावीच.
लासलगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या लोणवाडी (ता. निफाड) परिसरातल्या शेततळ्यात (farm ponds) पडून दोन सख्या भावांचा (brothers) मृत्यू झाल्याची घटना घडलीय. यात चार वर्षांच्या कुणाल गायकवाड आणि सात वर्षांच्या गौरव गायकवाडचा समावेश आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कुणाल आणि गौरव खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते फिरता-फिरता शेततळ्याकडे गेले. लहानगा कुणाल शेततळ्यातल्या पाण्यात पडला. ते पाहून गौरवने आरडाओरडा केला. मात्र, परिसरात कोणी नव्हते. त्यांच्या मदतीला कोणीही धावले नाही. शेवटी कुणालला बाहेर काढण्यासाठी गौरव पाण्यात उतरला. मात्र, शेततळ्यातून दोघांनाही बाहेर पडता आले नाही. वाट निसरडी असल्यामुळे दोघेही तळ्यातल्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याच दिवस आहेत. अनेक शाळकरी मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. तेव्हा मुले दिवसभर घरी एकीटच असतात. अनेक जण घराबाहेर पडतात. त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.
‘त्या’ घटनेची आठवण ताजी
चांदवड तालुक्यातल्या (जि. नाशिक) पाटे येथेही काही दिवसांपूर्वी ओम तळेकर आणि प्रणव तळेकर या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यातला ओम हा 13 वर्षांचा होता. तो इयत्ता सातवीच्या वर्गात शिकायचा. दुसरा मुलगा प्रणव. तो 11 वर्षांचा होता. तो पाचवीच्या वर्गात शिकायचा. हे दोघे भाऊ घरातील शेळ्या शेतात चारायला घेऊन गेले होते. शेळ्या नाल्याजवळ गेल्या. तिथून जवळच पुढे शेततळे होते. त्यांनी शेततळ्याकडे पळ काढला. शेळ्यांना वळवायचे म्हणून लहान प्रणव शेततळ्यावर गेला. मात्र, त्याचा पाय घसरला. तोल गेला. त्यामुळे तो शेततळ्यात पडला. आपला लहान भाऊ शेततळ्यात पडल्याचे दिसताच मोठ्या ओमने मागचा पुढचा विचार न करता शेतळ्यात उडी मारली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
हे टाळता येऊ शकते…
मुलांचे हे हाकनाक मृत्यू टाळता येऊ शकतात. पालकांनी आपले मूल खेळायला कुठे जात आहे, यावर जरूर लक्ष ठेवावे. शक्यतो मुलांना घराबाहेर खेळायला पाठवताना एकट्याला पाठवू नये. त्याच्यासोबत कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावीच. पाणी साचलेले मोठे खड्डे, खाण, विहीर, तलाव इत्यादी ठिकाणी मुलांना खेळायला एक तरी पाठवू नये. पाठवले तर त्यांच्यासोबत घरातीलच कोणीतरी व्यक्ती असावी. अन्यथा मुले पाणी कमी आहे म्हणून पाण्यात उतरतात. अनेकदा मुलांचा पाय घसरतो. असे काहीही होऊ शकते. त्यामुळे पुढची दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.
इतर बातम्याः