Nashik Water Storage: नाशिकमध्ये झळा तीव्र; जिल्ह्यात फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Nashik Water Storage: नाशिकमध्ये झळा तीव्र; जिल्ह्यात फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण.
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 12:21 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय, तर दुसरीकडे पाणी टंचाईही (water scarcity) तीव्र होताना दिसतेय. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आजमितीस जिल्ह्यातील 24 प्रकल्पात 28 हजार 820 दशलक्ष घनफूट म्हणजेच 44 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवसापर्यंत धरण प्रकल्पांत 28 हजार 219 दशलक्ष घनफूट म्हणजेच 43 टक्के पाणीसाठा (water storage) शिल्लक होता. यंदा उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले. गोदावरी नदीला तब्बल पाच वेळेस पूर आला. मात्र, तरीही पाणीसाठा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी तर लोडशेडिंगमुळे शेतात असलेले पाणी शेतकऱ्यांना पिकांना देता येत नाही. त्यामुळे करावे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

नाशिकमध्ये आज निर्जळी

नाशिकमध्ये आज सातपूर, सिडको, नाशिक पश्चिममधील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. शिवाय अनेक भागामध्ये कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. सध्या शिवाजीनगर जलशुद्धीकेंद्रापासून सुरू होणारी आणि सातपूर, सिडको, नाशिक पश्चिम भागातील पाण्याची टाकी भरणाऱ्या बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंटच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळीही येथे कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

कोठे नाही पाणी?

नाशिकमध्ये आज नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, आकाशवाणी टॉवर, तिरुपती हाउस परिसर, सहदेव नगर, पंपिंग स्टेशन, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, चुंचाळे, दत्तनगर, माउली चौक, इंद्रनगरी, कामटवाडा, धन्वंतरी, कॉलेज परिसर, दत्तनगर, मटालेनगर, शिवशक्तीनगर, आयटीआय पूल परिसर, दातीर मळा अलीबाबानगर, खुटवडनगर, माउली लॉन्स, वावरेनगर, अंबड, महालक्ष्मीनगर, महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पीटीसी संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, तिडके कॉलनी, कुटे मार्ग, चांडक सर्कल, तुपसाखरे लॉन्स, कालिकानगर, गडकरी चौक या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.