Nashik Water : नाशिकमध्ये उद्या निर्जळी, अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

| Updated on: Apr 19, 2022 | 12:56 PM

नाशिकमध्ये (Nashik) उद्या बुधवारी सातपूर, सिडको, नाशिक पश्चिममधील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने कळवण्यात आले आहे. शिवाय अनेक भागामध्ये कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. गुरुवारी सकाळीही येथे कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

Nashik Water : नाशिकमध्ये उद्या निर्जळी, अनेक भागात पाणीपुरवठा राहणार बंद!
नाशिकमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) उद्या बुधवारी सातपूर, सिडको, नाशिक पश्चिममधील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने कळवण्यात आले आहे. शिवाय अनेक भागामध्ये कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. सध्या शिवाजीनगर (Shivajinagar) जलशुद्धीकेंद्रापासून सुरू होणारी आणि सातपूर, सिडको, नाशिक पश्चिम भागातील पाण्याची टाकी भरणाऱ्या बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंटच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीचे काम उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. एकीकडे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील अनेक गाव आणि पाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. विशेष म्हणजे यंदा पाच वेळेस गोदावरीला पूर आला. जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपले. त्यानंतरही केवळ सोयी नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरू असल्याचे समोर येत आहे.

सातपूरमध्ये येथे नाही पाणी

नाशिकमध्ये बुधवारी नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, आकाशवाणी टॉवर, तिरुपती हाउस परिसर, सहदेव नगर, पंपिंग स्टेशन, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर या भागात पाणी येणार नाही. सोबतच प्रभाग क्रमांक आठ, नऊ, दहा अकरा, सव्वीस आणि सत्तावीसमधील चुंचाळे, दत्तनगर, माउली चौक या भागातही पाणी येणार नाही.

सिडकोत येथे पाणी नाही

नाशिमधील सिडको भागात बुधवारी प्रभाग क्रमांक पंचवीसमधील इंद्रनगरी, कामटवाडा, धन्वंतरी, कॉलेज परिसर, दत्तनगर, मटालेनगर, शिवशक्तीनगर, आयटीआय पूल परिसर, प्रभाग सत्तावीस चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा अलीबाबानगर, खुटवडनगर, माउली लॉन्स, वावरेनगर, अंबड, महालक्ष्मीनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

शांतीनिकेतनमध्ये येथे नाही पाणी

नाशिकमधील प्रभाग क्रमांक बारा येथील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पीटीसी संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, तिडके कॉलनी, कुटे मार्ग, चांडक सर्कल, तुपसाखरे लॉन्स, कालिकानगर, गडकरी चौक या भागातही पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळीही येथे कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!