Nashik | नाव मोठे लक्षण खोटे; सुप्रसिद्ध मेकअप क्लासच्या संचालकाचा महिलेवर बलात्कार

नाशिक शहरातील एका सुप्रसिद्ध अशा मेकअप क्लासचालकाच्या संचालकाने विवाहितेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी संशयित एन. ललित मेकअप क्लासेसचा संचालक एन. ललित, त्याची पत्नी, मित्र आणि मित्राच्या पत्नीवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एन. ललितला बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik | नाव मोठे लक्षण खोटे; सुप्रसिद्ध मेकअप क्लासच्या संचालकाचा महिलेवर बलात्कार
नाशिकमधील एन. ललित मेकअप क्लासमध्ये बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:37 AM

नाशिकः नाशिक (Nashik) शहरातील एका सुप्रसिद्ध अशा मेकअप क्लासचालकाच्या संचालकाने विवाहितेवर बलात्कार (rape) केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी संशयित एन. ललित मेकअप क्लासेसचा संचालक एन. ललित, त्याची पत्नी, मित्र आणि मित्राच्या पत्नीवर गंगापूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य संशयित एन. ललितला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, पीडितने एन. ललित मेकअप क्लासेसची ख्याती लक्षात घेऊन येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. एन. ललितने याचाच फायदा घेतला. पीडितेशी चांगली ओळख निर्माण केली. तिने त्याच्यावर विश्वास टाकला. याचाच फायदा घेत त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकले. या हॉटेलमधील तळमजल्यात एक सलून आहे. तिथे नेऊन अत्याचार केला. शिवाय पुढे वारंवार ब्लॅकमेल करून तिच्या अत्याचार केला. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

शुटींग केले, फोटो काढले

एन. ललित मेकअपमनचे शहरात चांगलेच नाव आहे. त्यामुळे अनेक महिला येथे प्रशिक्षणासाठी येतात. याचाच फायदा त्याने उचलल्याचे समजते. पीडितेवर बलात्कार केला. ती गुंगीत असल्याने अत्याचार करतानाचे मोबाइल चित्रिकरण केले. फोटो काढले. हे फोटो पतीला दाखवेन म्हणत तो धमकी द्यायचा. याच बळावर त्याने विवाहितेवर वारंवार बलात्कार केला. अनैसर्गिक अत्याचारही केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

गर्भपात केल्यानंतरही…

मुख्य संशयिताला या साऱ्या प्रकरणात त्याची पत्नी, मित्र आणि मित्राच्या पत्नीने मदत केली. अत्याचाराचमुळे पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करण्यात आला. गर्भापातानंतरही एन. ललितने पीडितेवर अत्याचार सुरू केले. या अत्याचाराला आणि वारंवार होणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने गंगापूल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

त्या दिशेने तपास…

एन. ललितचे शहरात चांगलेच नाव आहे. त्याने असेच प्रकार इतर महिलांसोबत केले असण्याची शक्यता आहे. मात्र, बदनामीमुळे महिला तक्रार नोंदवायला घाबरतात. हे पाहता पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. मात्र, मेकअप चालकाच्या या प्रतापाने पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.