आचारसंहिता लागू होण्याआधी…; अजित पवारांचा नाशिककरांना शब्द

Ajit Pawar on Vidhansabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना नाशिककरांना शब्द दिला आहे. निवडणुकीचा आचारसंहिता लागण्याआधी विकासनिधी दिला जाईल, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

आचारसंहिता लागू होण्याआधी...; अजित पवारांचा नाशिककरांना शब्द
अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 7:50 AM

नाशिक जिल्ह्यातील येवल्या शिवसृष्टी टप्पा – 1 प्रकल्पाचं उद्धाटन झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा विडा आम्ही उचलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य अर्थात स्वराज्य स्थापित केलं. हीच कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना आम्ही पुढे नेत आहोत. महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार यावेळी म्हणाले. पहिल्या टप्प्याचे लोकार्पण जाहीर झालं असे जाहीर करतो. मला भूमिपूजन करण्याच्याही संधी मला मिळाली, त्याबद्दल धन्यवाद देतो, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचा नाशिककरांना शब्द

शिवसृष्टी टप्पा – 1 प्रकल्पाच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवारांनी नाशिककरांना शब्द दिला आहे. येवल्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम छगन भुजबळ यांच्या माध्यमातून झालं आहे. त्यांना संधी दिली तेव्हापासून त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही. शिवसृष्टीच्या कामाला पूर्ण करण्यासाठी 10 कोटी लागो नाहीतर 15 कोटी निधी लागो. पण आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हा निधी दिला जाईल हा शब्द देतो, असं अजित पवार म्हणाले.

येवल्याचा इतिहास, येवल्याची पैठणी सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ यांनी येवल्याच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मांजरपाड्याचे पाणी आणायचे असं छगन भुजबळ यांनी ठरविले होते आणि ते त्यांनी करून दाखवलं. कोणतेही काम असेल त्यात मी बारकाईने पाहतो, वळब्यात काम आहे की नाही मी बघणारा कार्यकर्ता आहे, असं अजित पवार म्हणाले

फुले- शिव- शाहूंच्या विचाराने पुढे जायचंय- अजित पवार

मालवणला उभा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. काय त्याची अवस्था झाली मी माफी मागितली होती. पण इथं जो पुतळा बसविला तो उभा नाही, पूर्णकृती पुतळा आहे. जांभा दगड वापरला आहे. तो कोकणात असतो, मजबूत दगड आहे. सिंहासनावर बसविलेले पुतळे रायगड, विधानभवनात आहेत. त्या पुतळ्यांपेक्षा हा पुतळा मोठा केला पाहिजे. येवलेकरांनो सिंहसनावरील सर्वात मोठा पुतळा आहे, हे तुमचे भाग्य आहे. नाशिकला फुलेंचा अर्धपुतळा उभारला तोही देशातील सर्वात मोठा पुतळा आहे. फुले- शिव- शाहूंच्या विचाराने आम्ही पुढे जायचं ठरवलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.