“विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर”;राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर तोफ डागली

भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि त्याचा त्रास विरोधी पक्षातील नेत्यांना दिला जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विरोधी पक्षांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर;राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर तोफ डागली
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 4:12 PM

लासलगाव/नाशिक : भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सरकार विरोधात बोलणाऱ्यांविरोधात ईडी, सीबीआयसारख्या संस्था लावून त्यांना अटक करण्याचे काम भाजपकडून सातत्याने करण्यात आले. भजापच्या नेत्यांकडून विरोधकांवर हा सातत्याने प्रयोग करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीका करताना विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ते आज येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला.

विरोधकांवर स्वार्थी वृत्तीने कशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणामार्फत कारवाई केली जाते याचे त्यांनी आपल्यासह कोण कोणत्या नेत्यांवर कारवाई केली जाते असं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यामुळे आता विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्र लिहिले आहे की भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या गैरवापर करत आहे.

याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ यांनी सांगितले की, पहिला प्रयोग हा माझ्यावरच करण्यात आला आहे. राजकीय दृष्टीतून जिथे जिथे भाजपच्या विरोधात बोललं जातं.

जिथं जिथं त्यांच्या विरोधातील सरकार आहे तेथील प्रमुख नेत्यांवर अशा यंत्रणेद्वारे बडगा उचलला जातो आहे. एवढ्या पाच सहा वर्षांमध्ये अनेक लोक ईडीने पकडले मात्र याच्या मागील विचार केला तर 68 ते 70 वर्षात एक ते चार माणसंच या प्रकरणी पकडली गेली आहेत.

आता तर रोज कोणाला अन कोणाला ते पकडले जात आहे. महाराष्ट्रसह इतर राज्यातदेखील याच गोष्टी चालू असून विरोधी पक्षाचे तोंड दाबण्यासाठी अशा यंत्रणाचा गैरवापर केला जातो आहे असं भुजबळ यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी ईडी, सीबीआय आणि इतर प्रकारच्या तपास यंत्रणांचा वापर करत कशा पद्धतीने नेत्यांना त्रास दिला जातो आहे.

भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आणि त्याचा त्रास विरोधी पक्षातील नेत्यांना दिला जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....