पदवीधर निवडणूक सुधीर तांबे यांच्या अंगलट”; भुजबळांनी टीका करुनही तांबे शांतच…
विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुधीर तांबे यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर न देता त्यांनी मला काही बोलायचे नाही, मला माफ करा असं सांगत त्यांनी माध्यमांसमोरुन काढता पाय घेतला.

नाशिकः नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी विरुद्ध सुधीर तांबे, आणि सत्यजित तांबे असा सामना पाहायला मिळत आहे. पदवीधर निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये जोरदार कल्लोळ माजला आहे. सुधीर तांबे पदवीधर मतदार निवडणुकीसाठी एबी फॉर्म देऊन त्यांनी तो का भरला नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
तांबे पितापुत्रावर छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. तर सुधीर तांबे यांनी आपल्या मुलासाठी महाविकास आघाडी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळाासहेब थोरात यांना तांबे पितापुत्राने अडचणीत आणल्याचे मत छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केले.
तर त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात यांनाही अडचणीतही आणले गेले आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या आदराचा पालापाचोळा केल्याची सडकून टीका छगन भुजबळ य़ांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रचारावेळी त्यांनी सुधीर तांबे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर येवला येथे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी आलेल्या.
विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुधीर तांबे यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर न देता त्यांनी मला काही बोलायचे नाही, मला माफ करा असं सांगत त्यांनी माध्यमांसमोरुन काढता पाय घेतला.
सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी पाचशे खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र प्रचार सभेा तीन ते साडेतीन तास उशीर झाल्याने या सभेच जास्त गर्दी दिसून आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.