नाशिक: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या कोरोना लसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या शैलीत आणखी एक वक्तव्य केलं आहे. रामायणाचा दाखला देत इंदोरीकर महाराजांनी टोला लगावला आहे. राम वनवासाला गेला तेव्हा त्यानं सीतेला सोबत नेलं होतं. आता राम क्वारंटाईन झाला तर सीतेन डोकवून पाहिलं नाही, डोकवून, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
“अहो 14 वर्ष वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकवून नाही पाहिला रे”, असं वक्तव्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलं आहे.
“कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असं ते म्हणाले.
इतर बातम्या:
Video : कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
Nivrutti Maharaj Indorikar statement on people behaviour during Corona Pandemic