“…म्हणून पद्मश्री पुरस्कारासाठी 11 वर्षे थांबावं लागलं”, सुरेश वाडकर यांची उद्विग्न प्रतिक्रिया
भूमाफियांनी त्रास दिल्यानंतर मला कोणीही मदत केली नाही. भूखंड खरेदी प्रकरणामुळे पद्मश्री पुरस्कारासाठी मला तब्बल 11 वर्षे थांबावं लागलं," अशी खंत वाडकर यांनी बोलून दाखवली.
नाशिक : वादग्रस्त भूखंडाची खरेदी केल्यानंतर काही वर्षांपूर्वी अडचणीत आलेले प्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. “भूमाफियांनी त्रास दिल्यानंतर मला कोणीही मदत केली नाही. भूखंड खरेदी प्रकरणामुळे पद्मश्री पुरस्कारासाठी मला तब्बल 11 वर्षे थांबावं लागलं,” अशी खंत वाडकर यांनी बोलून दाखवली. नाशिक पोलिसांनी भूमाफियाविरोधात तयार केलेल्या एका माहितपटाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (no one helped me in disputed land purchase I have waited 11 years of Padmashree award said Suresh Wadkar)
पुरस्कार घेण्यासाठी मला अकरा वर्षे वाट बघावी लागली
भूमाफियांविरोधात नाशिक पोलीस आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी भूमाफियांवर एका माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाचे उद्घाटन सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वाडकर यांनी आपली खंत बोलून दाखवली. काही वर्षांपूर्वी भूमाफियांचा त्यांना कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला याबद्दलचा अनुभव त्यांनी सांगितला. “अनेक अधिकारी राजकीय नेते आपले फॅन आहेत. मात्र, अडचणीत आल्यानंतर कोणीही आपल्याला मदत केली नाही. या प्रकरणामुळे मला मनस्ताप तर झालाच, मात्र पद्मश्री सारखा पुरस्कार घेण्यासाठी मला अकरा वर्षे वाट बघावी लागली,” असं सुरेश वाडकर म्हणाले. तसेच याच उद्विग्नतेपोटी आपण देश सोडून जाण्याचं वक्तव्य केल्याचंदेखील सुरेश वाडकर म्हणाले.
वाडकर यांनी नाशिक पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं
दरम्यान, माहितीपटाच्या उद्घाटनावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना वाडकर यांनी नाशिक पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच सुरेश वाडकर यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासाठी खास “तुमसे मिलके ऐसा लगा” हे गाणं सादर केलं. तसेच नाशिक पोलीस दलाला त्यांनी धन्यवाद दिले.
इतर बातम्या :
पूरग्रस्त चिपळूणकरांना राष्ट्र सेवा दलाचा मदतीचा हात, 3 दिवस तळ ठोकून आरोग्यसेवाhttps://t.co/iIUyim4tq9#Flood #Chiplun #Mahad #RashtraSevaDal @RashtraSevaDal1
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2021
(no one helped me in disputed land purchase I have waited 11 years of Padmashree award said Suresh Wadkar)