सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही, अजित पवार यांची टीका
चव्हाण साहेबांपासून आतापर्यंत कितीतरी मुख्यमंत्री झालेत.
नाशिक – एकनाथ शिंदे यांनी विकासकामांना स्थगिती देऊ नये, अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. एकनाथ शिंदे तुम्हीदेखील कायम मुख्यमंत्री राहणार नाही. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा जोरदार निशाणा साधलाय. अजित पवार म्हणाले, मी यासंदर्भात एकनाथराव यांनासुद्धा सांगितलं. तुम्ही कायमचे मुख्यमंत्री राहणार आहात का. जोपर्यंत १४५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठींबा आहे, तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री आहात.
कधीतरी बदल होत असतात. चव्हाण साहेबांपासून आतापर्यंत कितीतरी मुख्यमंत्री झालेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र मोदी असे किती पंतप्रधान झालेत. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आतापर्यंत किती झालेत, असा सवालही अजित पवार यांनी विचारला.
अजित पवार म्हणाले, गुलाबराव पाटील यांना धन्यवाद देईन. मंत्र्याच्या अखत्यारीत हा कार्यक्रम घेता आला. अनेकांनी उत्साहानं स्वागत केलं. नाशिक कारखाना चालू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.
खासदार येऊ शकले नाही. राज्यातल्या अनेक साखर कारखाने पूर्ण कॅपेसिटीनं चाललेले नाहीत. काही सबसिडी देण्याचा विचार करत आहोत. हातानं ऊस तोडणारा मजूर आहे तो वेगवेगळ्या भागातून येतो. ते किती दिवस ऊस तोडणार आहेत, टप्प्याटप्प्यानं हार्वेस्टिंगकरिता मदत करावी लागेल. बँकांना फायदा द्यावाचं लागेल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.