धक्कादायक, गोमास तस्करीच्या संशयावरून घडली ही भयानक घटना

इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने धक्कादायक घटना घडली. गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केली. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली.

धक्कादायक, गोमास तस्करीच्या संशयावरून घडली ही भयानक घटना
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 6:18 PM

प्रतिनिधी, नाशिक : इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने धक्कादायक घटना घडली. गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केली. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली. आफन अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या हाणामारीत दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला. जखमीवर धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

दहा जणांकडून लोखंडी राडने मारहाण

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. एसएमबीटी कॉलेजजवळ रविवारी मध्यरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून स्विफ्ट कार MH02 BJ 6525 अडवण्यात आली. कारमधील दोन व्यक्तींना दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून लोखंडी रॉड आणि दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.

दहा संशयित ताब्यात

या मारहाणीत अफान अफान अब्दुल मजीद अंसारी (वय ३२ वर्षे रा. राहणार कुरेशीनगर, कुर्ला पूर्व) याचा मृत्यू झाला. तर, नासीर हुसेन कुरेशी (वय २४ वर्षे, रा. कुर्ला पूर्व) हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी १० संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्विफ्ट कारमध्ये गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून दोघांना मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास तपास करीत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी अशीच एक घटना

पंधरा दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. कसारा घाट परिसरात एका जमावाकडून गोमांस वाहतूक तस्करीच्या संशयातून गाडी अडवण्यात आली होती. यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीत दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी जमाव मारहाण करीत असल्याने एक जण जीव वाचवण्यासाठी अंधारात पळून गेला.

मात्र अंधारात पळताना तो थेट २५० फुट खोल दरीत पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. तर, एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पंधरा दिवसाच्या अंतराने तशीच घटना घडली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.