कांदा नगरीचा ‘राजा’शेतातच सडणार, उन्हाळ कांद्यामध्येही शेतकरी तोट्यातच
हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. लाल कांदा 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान तोट्यात विक्री केली होती.
नाशिक : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहे. कधी पडलेला बाजारभावर तर कधी नैसर्गिक संकट यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यातच मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. मागील महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला होता. तर या महिन्यात पुन्हा अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यातच कांदा उत्पादक आता दुहेरी संकटात सापडला असून कांदा उत्पादकांनी आता जगायचे कसं असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे काही कांदा उत्पादकांनी मागील महिन्यात कांदा पीकच शेतातून काढून टाकण्यात आले होते. तर आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतातील कांदा शेतातच सडणार अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांवर वारंवार संकटं येत आहेत. शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटं येत असल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतीवर केलेला खर्चही बाहेर निघण्याची शक्यता नाही अशी शोकांतिका कांदा उत्पादकांची झाली आहे. गेल्या महिन्यातही अवकाळी पावसामुळे लाल कांद्याला मोठा फटका बसला होता.
तर आता पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांनी आता जगायचे कसे आणिअसा सवाल उपस्थित करत आहेत. मागील महिन्यात कांदा उत्पादकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक मदत आणि कांद्याला अनुदानाची मागणी केली होती.
त्यानंतर ती मागणी सरकारने मान्य करून सरकारी अनुदानही जाहीर केले होते. मात्र आता या अनुदानापासून नाशिक जिल्ह्यातील 70ते 80 टक्के शेतकरी वंचित राहणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कांद्याची नगरी म्हणून ओळखला जाणाऱ्या लासलगाव व परिसरात रविवारी रात्री गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा पिकाला जोरदार फटका बसला आहे.
हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. लाल कांदा 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान तोट्यात विक्री केली होती.
त्यानंतर उन्हाळ कांद्यातून काहीतरी मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादकांनी घेतलेले उन्हाळ कांद्याचे पीक अवकाळी पावसामुळे हिरवल्याने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.