भगवान के घर, देर हे पर अंधेरा नहीं; शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई; ग्राहकमंचचे आदेश

इगतपुरी तालुक्यातील दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांची वर्षभराची सर्व भिस्त असते वडिलोपार्जित शेतीवरच. दोन वर्षांपूर्वी विशाल यांनी वडीवरहे येथील बियाण्यांच्या दुकानातून नन्हेमस मिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचे दोडक्याची बियाणे खरेदी केले होते.

भगवान के घर, देर हे पर अंधेरा नहीं; शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई; ग्राहकमंचचे आदेश
नाशिकमधील इगतपुरीच्या शेतकऱ्यांना ग्राहकमंचकडून नुकसानभरपाईImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 8:15 PM

नाशिकः ते म्हणतात ना भगवान के घर देर हे पर अंधेरा नही याचीच प्रचिती इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील शेतकऱ्याल आली आहे. तब्बल दोन वर्षाच्या यशस्वी लढ्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे (poor quality) शेतकऱ्यांना नुकसान (Farmers Loss) भरपाई देण्यात यावी असे आदेशच ग्राहक पंचायतीने दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर बियाणे कंपन्यांना दणका बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यानंतर त्याची माहिती कंपनीला देण्यात आली. त्यानंतरहा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नंतर जिल्हा ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील दशरथ मोतीराम मते आणि विशाल दशरथ मते यांची वर्षभराची सर्व भिस्त असते वडिलोपार्जित शेतीवरच. दोन वर्षांपूर्वी विशाल यांनी वडीवरहे येथील बियाण्यांच्या दुकानातून नन्हेमस मिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचे दोडक्याची बियाणे खरेदी केले होते. त्या बियाणांची योग्यप्रकारे लागवडही करण्या आली.

वेलीला फुले नाहीत फळे नाहीत

दहा फुटांपर्यंत दोडक्याच्या वेल आली, परंतु कोणत्याही प्रकारचे फळ न लागल्यामुळे त्यांनी संबधित कंपनीला याबाबतची माहिती देण्यात आली. ही माहिती कंपनीला देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी इगतपुरी येथील कृषी विभागाला या घटनेची माहिती दिली.

कंपनीचीही चौकशी

कृषी अधिकारी शीतल कुमार तवर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर तज्ज्ञांच्या समितीने बियाणे निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आणि संबंधित कंपनीची विचारणाही केली. त्यानंतरही कोणत्याही प्रकारचा न्याय शेतकऱ्याला मिळाला नाही.

ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल

यानंतरदेखील खचून न जाता विशाल आणि दशरथ मते यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ठरावाच्या आधारे जिल्हा ग्राहकमंचमध्ये तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने संबंधित कंपनी आणि शेतकरी दोघांचीही बाजू ऐकून घेत शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल देत शेतकऱ्यांना तब्बल साडे चौदा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मानसिक त्रास झाल्याने 15000 आणि इतर खर्च 10000 देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.