लवासा घोटाळा पुन्हा चर्चेत का आला? तक्रारदाराचे म्हणणं नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या
अॅड. नानासाहेब जाधव हे स्वतः तक्रारदार आहे. जाधव हे नाशिकमधील असून त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी मागणी केली आहे.
नाशिक : सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात असलेला लवासा प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून लवासा प्रकल्प उभारला गेला होता. हील स्टेशनमधून हा प्रकल्प राज्यभर चर्चेत आला होता. देशपातळीवर या प्रकल्पाची जोरदार चर्चा झाली होती. याच प्रकल्पाच्या पारदर्शकता आणि पवार कुटुंबाचे स्वारस्य होते असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवरुन नोंदविण्यात आले आहे. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोण ठेऊन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन तीस वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. इतकंच काय या प्रकल्पात नियमबाजय कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशीचा आदेश द्यावा या करिता नाशिकमधील नानासाहेब जाधव यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई येथील उच्च न्यायालयात जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. जाधव पेशाने स्वतः वकील आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला असून फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अॅड. नानासाहेब जाधव हे स्वतः तक्रारदार आहे. जाधव हे नाशिकमधील असून त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे या प्रकल्पात स्वारस्य होते असा आरोपही तक्रारदार नानासाहेब जाधव यांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका दाखल करण्यात आला असून लवास प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे.
2018 पासून या प्रकरणात नवनवीन याचिका दाखल होत असून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे त्यामुळे पवार कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.