एकीकडे रुग्णांची तडफड, दुसरीकडे 60 व्हेंटिलेटर धूळखात, नाशिकमध्ये गलथानपणाचा कळस

मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. | ventilators

एकीकडे रुग्णांची तडफड, दुसरीकडे 60 व्हेंटिलेटर धूळखात, नाशिकमध्ये गलथानपणाचा कळस
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 11:21 AM

नाशिक: एकीकडे राज्यात प्राणरक्षक प्रणालीअभावी (व्हेंटिलेटर्स) रुग्ण मरत असताना नाशिकमध्ये प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा नमुना समोर आला आहे. नाशिकमध्ये व्हेंटिलेटर बेड (ventilator bed) वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना, दुसरीकडे मात्र नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलिटर मिळूनही ते जोडणी अभावी अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (PM cares fund ventilators not used by Nashik Mahanagar Palika)

याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी करुन रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.

‘देशात लोक मरतायत, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारतात ऑक्सिजन (Oxygen) आणि वैद्यकीय साधनसामुग्रीचा पाठवायला सुरुवात केली होती. मदतीचा हा ओघ प्रचंड असल्याने साधारण प्रत्येक दिवशी भारतात वैद्यकीय साधनसामुग्री (Medical Aid) असलेली विमाने उतरत आहेत. मात्र, ही सर्व मदत नक्की जात कुठे आहे, असा सवाल आता अनेकजण उपस्थित करत आहेत.

सुरुवातीला केवळ विरोधकच हा प्रश्न विचारत होते. मात्र, आता यामध्ये अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एका पत्रकारपरिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अमेरिकी करदात्यांच्या पैशातून भारताला पाठवली जात असलेली मदत नेमकी कुठे पोहोचत आहे? या मदतीचे वितरण कशाप्रकारे होत आहे, याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही का, असा सवाल एका पत्रकाराने विचारला.

देशात लोक कोरोनामुळे मरत आहेत आणि परदेशातून आलेली वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवर धूळ खात पडली आहे, असा आरोप एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केला. सीएनएन वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात अनेक देशांनी वैद्यकीय मदत घेऊन आपली विमाने भारतात पाठवली होती. मात्र, ही सामुग्री रुग्णालयांमध्ये न जाता विमानतळावरच पडून आहे, असे ओवेसींनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

(PM cares fund ventilators not used by Nashik Mahanagar Palika)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.