नाशिक : मुंबईतील मंत्रालयासमोर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील प्रमुख शहरात आता कोण कोणत्या गटात जातो. यावरून अजूनही स्पष्टता नाही. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. तर ९ मंत्री सोडले तर बहुतेक सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हंटलं. त्यामुळे राज्यात शरद पवार आणि अजित पवार अशी दोन गट तयार झाली आहेत. आता कार्यालयावरून या गटात वाद सुरू झाले आहेत.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत मिळून हे कार्यालय आपल्या हातात घेतले. यावरून शरद पवार गटाचे काही लोकं नाराज झाले आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयात बैठक घेण्यावर ठाम आहेत. यावरून हा वाद निर्माण झालाय.
शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठक घेण्यावर ठाम आहेत. मात्र बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा अजित दादा-भुजबळ गटाने इशारा दिला आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आले आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता इंदापूर तालुका अजित पवारांसोबत आहे. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील, असा दावा तालुका अध्यक्ष कोकाटे यांनी केला आहे. आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी चर्चा करून निर्णय, असेही कोकाटे म्हणाले.