Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेम्पो चालक ते ग्राफिक्स डिझायनर अन् आता कमावतोय लाखो, प्रामाणिकपणा आणि कष्टाचं फळ पोराला मिळालं!

'कोशिश करनो वालो की, कभी हार नही होती', तशाप्रमाणेच या तरूणाला आता यश आलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडीओ तयार करणं आपलं प्रोफेशन बनवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात काहीजण स्टार झालेले आहेत. अशाच प्रकारे आरिफ या तरूणाचंही आयुष्य बदललं आहे.

टेम्पो चालक ते ग्राफिक्स डिझायनर अन् आता कमावतोय लाखो, प्रामाणिकपणा आणि कष्टाचं फळ पोराला मिळालं!
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 9:35 PM

मुंबई : अहमदनगर शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बी.ए. झालेला युवक, टेम्पो चालवून तर कधी ग्राफिक्स डिजाईनिंग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र म्हणतात ना ‘कोशिश करनो वालो की, कभी हार नही होती’, तशाप्रमाणेच या तरूणाला आता यश आलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडीओ तयार करणं आपलं प्रोफेशन बनवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात काहीजण स्टार झालेले आहेत. अशाच प्रकारे आरिफ या तरूणाचंही आयुष्य बदललं आहे.

असा झाला रातोरात स्टार

गेल्या काही वर्षांपासून एखाद्या कार्यक्रमामध्ये बॉडीगार्ड ठेवणं ही एक स्टाईलच झाली होती. एका कार्यक्रमाची पत्रिका त्याने डिझाईन केली होती. ती पत्रिका घेण्यासाठी संबंधित ग्राहक दुकानामध्ये आला त्यावेळी आरिफची बॉडी पाहून त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला यायला सांगितलं. एका कार्यक्रमामध्ये तो गेला आणि फक्त तिथे उपस्थित राहण्याचे त्याला सातशे रूपये मिळाले होते. आरिफला आनंद झाला होता त्याने आपल्या फेसबुकला याबाबत पोस्ट करत आपला फोटो पोस्ट केला, यावर त्याला हजारो लाईक्स मिळाले.

भारतामध्ये त्यावेळी टिकटॉक सुरू होतं, आरिफ आपले व्हिडीओ तयार करून टाकू लागला. व्हिडीओ व्हायरल होत गेले आणि तो फेमस होऊ लागला. या सगळ्यात त्याने आपल्या काही मित्रांना घेऊन एक बाऊन्सर ग्रुप सुरु केला आणि आपल्या मित्रांना घेऊन प्रोफेशनल व्हिडीओ बनवू लागला. याचा फायदा असा झाला की त्याच्या बाऊंसर ग्रुपला अनेक कार्यक्रमांसाठी लोक बोलावू लागले. यामध्ये असं झालं की लोक आरिफलाच पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले.

टिकटॉक बंद झाल्यावर त्याने इन्स्टावर आरिफ प्रिन्स म्हणून अकाऊंट तयाक केलं. यावर तो आपले व्हिडीओ टाकू लागला. काही दिवसात त्याचे 31 लाख फॉलोअर्सचा झाले. आताच तो मुंबईच्या हाजी अली दर्गावर गेला होता. त्यावेळी तिथे तो आल्याची बातमी समजताच गर्दी झाली होती. गर्दीमध्ये त्याचा शर्टही फाटला गेला. शेवटी त्याला तसच माघारी परतावं लागलं.

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.