मनसे पक्षाचा तो आदेश पदाधिकाऱ्यांनी वाचून दाखविला, सुरू झाली कुजबूज

| Updated on: Oct 16, 2022 | 3:09 PM

मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, बापू वागस्कर या पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठक घेतली होती.

मनसे पक्षाचा तो आदेश पदाधिकाऱ्यांनी वाचून दाखविला, सुरू झाली कुजबूज
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहे. आपले कार्यक्षेत्र सोडून अन्य कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकटीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या निर्णयावरुन मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे. अधिकार घटविण्याचा ही बाब असून संबंधित प्रतिबंध मागे घ्यावा अशी दबक्या आवाजात मनसे वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकता त्यामुळे मनसेच्या वतीने राज्यातील विविध ठिकाणी तयारी केली जात आहे.

मुंबई, पुणे नंतर नाशिकमध्ये राज ठाकरे यांचे दौरे सुरू आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांचे वारंवार दौरे होत आहे.

हे सुद्धा वाचा

त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी देखील वारिष्ट नेते संवाद साधत असतांना पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेप सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली होती.

मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, बापू वागस्कर या पदाधिकाऱ्यांनी मनसे पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठक घेतली होती.

मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नाराजी पसरल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहर हद्दीत शहराध्यक्ष, विधानसभा निरीक्षक, विभागप्रमुख, शाखाध्यक्ष, राजदूत असा पदभार आहे.

आत्ताच्या काळात सामाजिक घटकांवर काम करतांना शहर म्हणून देखील प्रश्न हाताळले जातात. मात्र यापुढे फक्त ज्या क्षेत्रासाठी नियुक्ती केली आहे.

त्या व्यतिरिक्त अन्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करता येणार नसल्याच्या स्पष्ट सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या आहे.