अपक्ष उमेदवाराचा प्रचार आणि थेट जिल्हा कमिटीच बरखास्त, कुणी आणि का घेतला हा निर्णय?

पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणे जिल्हा अध्यक्षांना भोवले आहे.

अपक्ष उमेदवाराचा प्रचार आणि थेट जिल्हा कमिटीच बरखास्त, कुणी आणि का घेतला हा निर्णय?
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 5:07 PM

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत चढत आहे. कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार या निवडणुकीत उतरले नाहीत. मात्र, महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तर, सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार की नाही याचा निर्णय अदयाप झालेला नाही. सत्यजित तांबे हे मूळचे कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उतरले आहेत. मात्र, सत्यजित तांबे यांचा प्रचार करणे एका जिल्ह्याध्यक्षाला चांगलेच अंगलट आले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, मविआच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनी पक्षविरोधी भूमिका घेत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवून दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितले होते. परंतु, ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना २४ जानेवारी निलंबित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश साळुंखे यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीच शिवाय त्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त केली आहे. याबाबत बोलताना नाना पटोले यांनी पिंपरी चिंचवड व कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. या पोटनिवडणुकीबाबत निर्णय झालेला आहे पण २ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची या विषयावर बैठक होणार आहे आणि या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.