Nashik Rain | नाशिक जिल्हात संततधार पाऊस सुरू, गंगापूर धरण 82 टक्के भरले
नाशिक जिल्हात संततधार सुरूच आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढ होतायं. आता गंगापूर धरण 82 टक्के भरले आहे. गंगापूर धरणातून आज पुन्हा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
नाशिक : नाशिक (Nashik) शहर व जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील धरणे जवळपास ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र आहे. पावसाच्या संततधारमुळे गंगापूर धरण 82 टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. आज पुन्हा पाण्याचा (Water) विसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल दिवसभरात धरणातून 1514 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणातून (Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीला पुरस्थिती निर्माण झालीयं.
गंगापूर धरण 82 टक्के भरले, पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
नाशिक जिल्हात संततधार सुरूच आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढ होतायं. आता गंगापूर धरण 82 टक्के भरले आहे. गंगापूर धरणातून आज पुन्हा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून, परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश धरण शंभर टक्के भरली आहेत.
जिल्हातील इतर धरणे शंभर टक्के भरली
काही दिवसांपूर्वी जिल्हात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आता पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्हात पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झालीयं. इतकेच नाही तर गंगापूर धरण सोडून जिल्हातील इतर धरणे शंभर टक्के भरली आहेत. गंगापूर धरण 82 टक्के भरल्याने आता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. यामुळे गोदावरी नदीला पुरस्थिती निर्माण झाली असून नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलायं.