Raj Thackeray | 2014 मधील भाजपचं यश कुणाचं? मोदींचं की…?; राज ठाकरे यांनी नेमकं काय सांगितलं?

Raj Thackeray | 2014 मधील भाजपचं यश कोणामुळे आले, भाजपच्या विजयाचे शिल्पकार तरी कोण? मोदी की अजून कोणी, राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत त्याचं उत्तर दिले. राजकारणात वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट लागते पेशन्स, असा मंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Raj Thackeray | 2014 मधील भाजपचं यश कुणाचं? मोदींचं की...?; राज ठाकरे यांनी नेमकं काय सांगितलं?
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 1:54 PM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक | 9 March 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्यांना हात घालत अनेकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांचे भाषण म्हणजे केवळ हश्या आणि शिट्याच नसतात. तर त्यात चिंतन आणि एका विचार पण असतो, अशी कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना असते. राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजीत मेळाव्यात खास ठाकरी शैलीत अनेक गोष्टींचा धांडोळा घेतला. त्यांनी भाजपच्या यशाचं मोजमाप केलं. 2014 मधील भाजपचं यश कोणामुळे आले, भाजपच्या विजयाचे शिल्पकार तरी कोण? मोदी की अजून कोणी, यावर काय म्हणाले राज ठाकरे?

मग यश तरी कुणाचं?

‘आपल्याला वाटतं मोदींचं जे यश आहे, २०१४ साली आलेलं. ते मोदींचं आहे. त्यातील काही भाग मोदींचा असेल. पण त्याचं संपूर्ण श्रेय इतकी वर्षापासून त्यांचे जे कार्यकर्ते झटत आहे, त्यांचं आहे. १९५२ साली त्यांचा पक्षल स्थापन झाला. जनसंघ. १९८० साली त्यांचं भाजप असं नामकरण झालं. ५२ सालापासून अनेकांनी खस्ता खाल्ल्या. महाराष्ट्रात मोदी, मुंडे आणि वहाडणे, हशू आडवाणी. इतक्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्यातून हे यश आलं आहे. अचानक आलं नाही’, अशी उलगड त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

सयंम ठेवा

महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात दरवर्षी आपण वर्धापन दिन साजरा करू. आज पक्षाला १८ वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला राजकीय इतिहास सांगणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वडा टाकला की तळून आला पाहिजे. पण बटाटा शिजवावा लागतो, त्यात काही गोष्टी टाकायच्या असतात मग तळावा लागतो. ही सर्व प्रोसेस बाजूला. फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळून आला पाहिजे. सर्व गोष्टी फास्टफूड लेव्हलला गेल्या आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेल.. राजकारणात वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट लागते पेशन्स. इतर पक्षाचे यश तुम्हाला आता दिसतंय, असा मंत्र त्यांनी मनसैनिकांना दिला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.