Malegaon | सहा वर्षात घेतले 100 कुपोषित बालक दत्तक, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर. पी. कुवर यांचे अनोखे दातृत्व

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कुवर यांना कोरोना झाला होता. आजपर्यंत केलेल्या कामामुळेच मी कोरोनामुक्त होत मृत्यूच्या दारातून घरी परत आलो. दैव योगाने मिळालेले हे बोनस आयुष्य निराधार व कुपोषित बालकांबरोबरच सामाजिक कामासाठी खर्च करण्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.

Malegaon | सहा वर्षात घेतले 100 कुपोषित बालक दत्तक, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर. पी. कुवर यांचे अनोखे दातृत्व
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 8:44 AM

मालेगाव : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मालेगाव (Malegaon) येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर. पी. कुवर यांनी 100 वे कुपोषित बालक दत्तक घेत देशाचा रौप्य महोत्सव आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा केला. कुवर यांच्या या अनोख्या दातृत्वामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. कुवर हे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त (Retired) झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कामात स्वत:ला वाहून घेतले आहे. त्याच बरोबर कुवर यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे अनके प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविले आहेत. आपण ज्या समाजात राहतो. त्या समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनाशी बाळगत कुवर यांनी कुपोषित व निराधार बालक दत्तक घेण्याचा उपक्रम (Activity) सुरु केला.

सहा वर्षाच्या कार्यकाळात 100 कुपोषित बालक घेतले दत्तक

2016 मध्ये त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आक्रणी धडगाव येथील पहिले कुपोषित बालक दत्तक घेतले. या सहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी 100 कुपोषित बालक दत्तक घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. नुकत्याच देशाच्या राष्ट्रपतीपदावर आदीवासी समाजाच्या द्रोपदी मुर्म यांची निवड झाल्याचे औचित्य साधत त्यांनी तालुक्यातील अजंग येथील निराधार मुलीसदेखील दत्तक घेत तिचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला आहे. कुवर यांनी विविध भागातील व जिल्ह्यातील आत्तापर्यंत 100 कुपोषित व निराधार मुलांना दत्तक घेतले आहे. पत्नी, मुले, सुना यांनी पाठबळ दिल्यामुळेच मी मुलांना दत्तक घेऊ शकलो असे कुवर यांनी कबुल केले.

हे सुद्धा वाचा

कुवर परिवारातर्फे वर्षभर शैक्षणिक खर्च व किराणा साहित्य दिले जाते

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कुवर यांना कोरोना झाला होता. आजपर्यंत केलेल्या कामामुळेच मी कोरोनामुक्त होत मृत्यूच्या दारातून घरी परत आलो. दैव योगाने मिळालेले हे बोनस आयुष्य निराधार व कुपोषित बालकांबरोबरच सामाजिक कामासाठी खर्च करण्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. कुवर यांनी नुकतेच येथील राष्ट्रीय एकात्मिक प्रकल्प कार्यालयात तालुक्यातील वजीरखेडे येथील दोन बालके दत्तक घेऊन 100 वे बालक दत्तक घेण्याचा मानस पुर्ण केला आहे. दत्तक घेतलेल्या बालकांवर कुवर परिवारातर्फे वर्षभर शैक्षणिक खर्च व त्याचप्रमाणे वर्षभर लागणारा किराणा बाजार घेऊन दिला आहे.

कुवर यांनी दत्तक बालके घेण्याच्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक

कुवर यांनी दत्तक बालके घेण्याच्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 100 वे बालक दत्तक घेतल्याने कुवर यांच्या या उपक्रमाची लिमका बुक ऑफ वर्ल्ड तसेच निगीन बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, एकात्मिक प्रकल्प अधिकारी एस. अहिरराव, डाक विभागाचे उपअधिक्षक संदीप पाटील, निमगावचे माजी सरपंच दुर्गादास नंदाळे, भागचंद तेजा, बळीराम अहिरे, जे. के. रॉय, के. आर. मोरे, जे. एस. देसाई, ओ. पी. सावंत, एस. एम. तडवी, यु. बी. ठोके, अरुणा देवरे, भारती बोराळे, आय. बी. शेख आदी उपस्थित होते.

घरातील प्रत्येक सदस्याच्या पगारातून काही रक्कम वेगळी काढली जाते

कुवर यांच्या घरात सहा सदस्य आहेत. हे सर्वजण शासकीय नोकरीत आहेत. प्रत्येकाच्या पगारातून काही रक्कम दर महिन्याला वेगळी काढली जाते. त्याच रक्कमेतून कुपोषित बालकांना खाण्यासाठी लागणारे साहित्य तसेच दत्तक घेतलेल्या मुलांचा शैक्षणिक खर्च भागवला जातो. म्हणजे कुवर यांनी जरी कुपोषित मुलांना दत्तक घेण्याचा मानस केला असला तरीही त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना भक्कम सपोर्ट केला जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.