परिवहन विभागात गैरव्यवहाराचा आरोप, राज्याचे परिवहन आयुक्त नाशिकला जाणार, सूत्रांची माहिती

राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज नाशिकमध्ये चौकशीसाठी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. Avinash Dhakane Gajendra Patil

परिवहन विभागात गैरव्यवहाराचा आरोप, राज्याचे परिवहन आयुक्त नाशिकला जाणार, सूत्रांची माहिती
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 10:31 AM

नाशिक: आरटीओ विभागातील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात केली पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीसाठी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज नाशिकमध्ये चौकशीसाठी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अविनाश ढाकणे हे क्राईम ब्रँच युनिटकडून सखोल माहिती घेण्याची शक्यता आहे. (Road Transport Commissioner Avinash Dhakane may be visit Nashik for enquiry of complaint of Gajendra Patil)

नेमकं प्रकरण काय?

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.

राज्याचे परिवहन आयुक्त नाशिकमध्ये?

तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीसाठी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज नाशिकमध्ये चौकशीसाठी येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अविनाश ढाकणे हे क्राईम ब्रँच युनिट कडून याप्रकरणाची सखोल माहिती घेणार असल्याची माहिती आहे. याशिवाय परिवहन आयुक्त तक्रारदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आरटीओचे निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेता चौकशीच्या क्राईम ब्रँच युनिटला सूचना दिल्या आहेत.

आरोप काय?

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केल्याची माहिती आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आरोप फेटाळले

अनिल परब यांनी एकापाठोपाठ एक सहा ट्विट करत निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, असं परब यांनी म्हटलं आहे. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

सत्य जनतेसमोर येईलच

मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही, असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे, असा दावा करतानाच या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

100 कोटींची महावसुली 300 कोटींवर?, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा; मनसेची मागणी

परिवहन खात्यातील कर्मचाऱ्याची मंत्र्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार; अनिल परब म्हणतात…

(Road Transport Commissioner Avinash Dhakane may be visit Nashik for enquiry of complaint of Gajendra Patil)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.