विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; सहा दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

निफाड तालुक्यातील (Niphad taluka) मौजे सुकेणे गावात गेल्या सहा दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद (Leopard Trapped) झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या (Forest Department) मदतीने विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; सहा दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
बिबट्या जेरबंद
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 4:03 PM

नाशिक : निफाड तालुक्यातील (Niphad taluka) मौजे सुकेणे गावात गेल्या सहा दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद (Leopard Trapped) झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या (Forest Department) मदतीने विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. शिकारीचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 14 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास सावजच्या  शोधात असलेला नर जातीचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या जाळ्यात जेरबद झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आज आणखी एक बिबट्या गावात जेरबंद झाला आहे. ग्रामस्थ सतीष मोगल यांच्या शेतात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट्या पडला होता. ही  बाब जेव्हा स्थानिकांच्या लक्षात आली तेव्हा याची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

बिबट्याची सुखरूप सुटका

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मौजे सूकेणे गावातील ओणे रोडवरील सतीष मोगल यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्या पडला. ही घटना ग्रामस्थांना कळताच त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली, विहिरीत पाणी जास्त असल्याने या बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी या विहिरीत आधीच एक खाट सोडली होती. या खाटेवर हा बिबट्या बसला होता. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला वर काढण्यात वनविभागाला यश आले.

ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

दरम्यान विहिरीतून बिबट्याची सुखरूप सुटका केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले. त्याला निफाडमधील नर्सरीत आणण्यात आले. हा बिबट्या अंदाजे सहा वर्षांचा नर बिबट्या असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. या बिबट्याची आता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दरम्यान या परिसरात आणखी काही बिबटे असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांना देखील लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिक, मालेगावमध्ये चोरट्यांचा हिवाळीबार; लगातार 6 घरांसह 7 दुकाने फोडली

रक्ताने माखलेला लालबुंद दगड सारे काही सांगतो; नाशिकमध्ये माजी कुलसचिवांचे खुनानंतरही हालहाल

महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार; नाशिकचे नेतृत्व कोणाकडे?

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.