सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही, शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्वाचा: संजय राऊत

सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही. आमच्यासाठी स्वाभिमान महत्वाचा आहे. बाळासाहेबर ठाकरे हे आमच्यासाठी स्वाभिमानाचं दुसरं नावं आहे, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut Shivsena)

सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही, शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्वाचा: संजय राऊत
संजय राऊत, नेते, शिवसेना
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 3:53 PM

नाशिक: शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. कोविडच्या काळात फिरता आलं नाही, बंधन होती, तरी राजकारण थांबत नाही. पक्षाची बांधणी करणं आमचं कर्तव्य आहे. सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही. आमच्यासाठी स्वाभिमान महत्वाचा आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी स्वाभिमानाचं दुसरं नावं आहे, असं संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut said Self esteem is must for Shivsena at Nashik gave answer to BJP )

पक्षसंघटनेचं काम चांगलं सुरु

आगामी काळात, कोणत्या दिशेने जायचं आहे, त्यानुसार काम सुरू आहे. संघटनेला गती मिळण्यासाठी हा दौरा आहे. उत्तर महाराष्ट्रचं शिवसेनेच्या वाटचालीत महत्वाचं योगदान आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्राची साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात मात्र आता घडी बसवली आहे.बदल करण्याची गरज वाटत नाही. शिवसैनिकांनी जबाबदारी म्हणून काम करावं, आमचे सर्व लोक चांगलं काम करतात.आता हळूहळू संघटनेचं काम चांगलं होतंय. अनुभवी लोकांची समिती स्थापन करु असं संजय राऊत म्हणाले.

वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही

महाराष्ट्रातील राजकारणी आपण  संस्कारी आहेत, इथं शत्रुत्व टोकाचं नसतं, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. वाघाच्या मिशीला हात घालण्याची कोणाची हिम्मत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील. इथं वाटाघाटी नाही, अशी माझी कमेंटमेंट आहे. आमच्या मनात संभ्रम नाही. या राज्याचं मुखमंत्रीपद शिवसेनेकडे राहील, असं राऊत म्हणाले.

नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. अनेक कार्यकर्ते सरस असतात.राजकारणात आकांक्षा ठेवा. हे सरकार बनवताना हे पक्ष विलीन झाले नाहीत.सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. आज आम्ही मुख्यमंत्री आहोत, कोणी कोणाला बोलवायचं हा त्याचा प्रश्न आहे.

गुप्त भेटीवर माझा विश्वास नाही. 2024 ला नरेंद्र मोदीच येणार ही देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात. विरोधी पक्ष एकत्र आला तर लढाई होईल. भविष्यात काय होणार नाही माहीत नाही. कोणाला राजकारण मुठीत ठेवता येणार नाही. प्रशांत किशोर अनेक जणांना भेटले,त्यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. कधी काळी ते भाजपसाठी काम करत होते. त्यांनी अनेकांसाठी काम केलंय, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

गुलामसारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तेव्हा शिवसेनेचा स्वाभिमान कुठं होता? राम कदम यांचा सवाल

संभाजीराजे हे उद्धव ठाकरेंचे मित्र, मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकावा: विनायक मेटे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.